शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वंचितांच्या मंगळसूत्राला सोलापुरच्या ‘बुद्धराष्ट्र’चा परिसस्पर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 10:28 IST

न्यू बुधवारपेठेत सामुदायिक विवाह : सात जोडप्यांच्या नवीन आयुष्याची होणार सुरुवात

ठळक मुद्देलग्न हा आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा सोहळा पैसा ही सर्वात मोठी अडचण सर्वसामान्य लोकांसमोर असते न्यू बुधवारपेठेत सामुदायिक विवाह

संताजी शिंदे । सोलापूर : घरात जेव्हा मुलगी वयात येते तेव्हा आई-वडिलांना तिच्या लग्नाची चिंता सुरू होते. मुलीला अपेक्षित वर मिळेल मात्र, तिच्या लग्नासाठी लागणारा पैसा हा त्याहून अधिक चिंतेचा विषय असतो. ही चिंता लक्षात घेऊन सात जोडप्यांचा विवाह लावण्याचा निर्णय बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आला आहे. वंचितांच्या मंगळसूत्राला खºया अर्थाने ‘बुद्धराष्ट्र’चा परिसस्पर्श होत असून २५ नोव्हेंबर रोजी हा सोहळा पार पडत आहे. 

एक पिता गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेतील कंत्राटी वाहन चालक म्हणून काम करतोय. आज कायम होईल, उद्या कायम होईल, या आशेपोटी आयुष्य कधी निघून गेलं माहीत नाही. लहान लहान मुलं मात्र बघता बघता मोठी झाली. मुलगी वयात आली. तिचं लग्न लावायचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. दररोज १५० ते २०० रुपयांच्या मजुरीवर सुताराचे काम करणाºया मजुरासमोरही हाच प्रश्न उभा होता. सेंट्रिंगवर जाऊन काम करणाºया बिगाºयांची व्यथाही  काही वेगळी नव्हती. मार्केट यार्डात आयुष्यभर पाठीवर पोती घेऊन हमाली करणाºया बापाला दिवसेंदिवस मुलीच्या लग्नाचं ओझं वाढत होतं. भाजी विक्रीतून पै-पै जमा केला तरी संसारात चार पैसे पाठीमागे पडत नव्हते, अशात मुलीचं लग्न करायचं कसं? या विचाराने एक पिता व्याकूळ झाला होता. 

पित्याचं निधन झालं, कसाबसा आईने संसार चालविला. मुलाचा संसार उभा करायचाय तर मग लग्न करणं गरजेचं आहे. कर्ता पुरुष घरात नाही. लग्नासाठी कोणाकडे हात पसराचे, या चिंतेमध्ये असताना बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानने मदतीचा हात दिला आणि मुलाच्या लग्नाची चिंता मिटली. प्रत्येकाची अशी वेगळी कथा आणि व्यथा जाणून बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानने यंदा प्रथमच वंचितांच्या घरातील लग्नसोहळा थाटात करण्याचा निर्णय घेतला. विजयादशमीच्या दिवशी काढण्यात येणाºया भव्य मिरवणुकीचा खर्च टाळून वंचितांच्या लग्नसोहळ्यासाठी सत्कारणी लावला जात आहे. 

लग्न हा आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा सोहळा असतो, तो थाटात पार पडावा, अशी प्रत्येक मुला-मुलीची इच्छा असते. पैसा ही सर्वात मोठी अडचण सर्वसामान्य लोकांसमोर असते. ही गरज ओळखून सामुदायिक विवाह सोहळ्याचा निर्णय घेतला. प्रथम प्रयत्नात सात जोडप्यांना विवाहबद्ध करीत आहोत. - अजित गादेकर, संस्थापक, बुद्धराष्ट्र प्रतिष्ठान

टॅग्स :Solapurसोलापूरmarriageलग्न