मंगल सातव यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:23 IST2021-05-06T04:23:22+5:302021-05-06T04:23:22+5:30

कुर्डूवाडी : मंगल राजाराम सातव (६५, रा. लऊळ, ता. माढा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, ...

Mangal Satav passed away | मंगल सातव यांचे निधन

मंगल सातव यांचे निधन

कुर्डूवाडी : मंगल राजाराम सातव (६५, रा. लऊळ, ता. माढा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्या नागपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश माणिकराव सातव, नगरचे सहायक धर्मादाय आयुक्त प्रताप सातव, दौंड रेल्वे पोलीस स्टेशन गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक जयसिंग सातव यांच्या मातोश्री होत.

दगडू कसबे

सुस्ते : दगडू सखाराम कसबे (८०, रा. खरसोळी, ता. पंढरपूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. ते खरसोळीचे सरपंच प्रज्ञा कसबे यांचे आजोबा होत.

भारत घळके

टेंभुर्णी: भारत बलभीम घळके (५५, रा. टेंभुर्णी, ता. माढा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन भाऊ व बहीण असा परिवार आहे.

संतोष राजमाने

टेंभुर्णी : संतोष सुरेश राजमाने (५६, रा, टेंभुर्णी, ता. माढा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. ते माजी सरपंच स्व. सुरेश शिवलिंग राजमाने यांचे पुत्र होत.

प्रदीप देशपांडे

सोलापूर : भारतीय स्टेट बँकेतील निवृत्त शाखा व्यवस्थापक प्रदीप विष्णुपंत देशपांडे (६५, रा. विजयनगर, जुळे सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून नातवंडे असा परिवार आहे.

सिद्धारमलू विडप

सोलापूर : माजी वैज्ञानिक सिद्धारमलू विडप (६९, रा. रविवार पेठ) यांचे निधन झाले. ते १९७९ ते २०१२ दरम्यान श्रीहरीकोटा व बंगलोर स्पेस रिसर्च सेंटर येथे कार्यरत होते. त्यांची अनेक संशोधन प्रसिद्ध आहेत. आयएसआरओ येथे ३१ वर्षे उत्कृष्ट कामगिरी बजावली.

महालिंग जाधव

कुरुल : महालिंग कृष्णा जाधव (५८, रा. कुरूल, ता. मोहोळ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. प्रगतशील शेतकरी अरुण जाधव यांचे ते वडील होत.

अकबर पटेल

सोलापूर : शहर पोलीस आयुक्तालयातील सेवानिवृत्त सहायक पोलीस फौजदार अकबर आदम पटेल (५९, रा. नीलेगाव, ता. तुळजापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांनी पोलीस खात्यात ३८ वर्षे सेवा बजावली.

अलका काकडे

पंढरपूर : माजी नगरसेविका अलका महादेव काकडे (६२, रा. पंढरपूर) यांचे निधन झाले. त्या पांडुरंग साखर कारखान्याचे चीफ अकौटंट रवींद्र काकडे यांच्या त्या मातोश्री होत.

हर्षराज बिले

मंगळवेढा : पंचायत समितीचे माजी सदस्य, दामाजी साखर कारखान्याचे माजी संचालक हर्षराज सुखदेव बिले (६०, रा. पाटकळ, ता. मंगळवेढा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. पाटखळच्या सरपंच उषाताई बिले यांचे ते पती होत.

बाबासाहेब बेलदार यांचे निधन

मंगळवेढा : संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाबासाहेब मच्छिंंद्र बेलदार (६०, रा. खंडकी, ता. मंगळवेढा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. खडकी येथील सरपंच रघुनाथ बेलदार यांचे ते वडील होत.

Web Title: Mangal Satav passed away