४ फेब्रुवारी रोजी मामासाहेब जगदाळे पुरस्कार वितरण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:44 IST2021-02-05T06:44:01+5:302021-02-05T06:44:01+5:30
बार्शी : येथील शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांची जयंती ‘समाज दिन’ म्हणून विविध कार्यक्रमांनी साजरी ...

४ फेब्रुवारी रोजी मामासाहेब जगदाळे पुरस्कार वितरण सोहळा
बार्शी : येथील शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांची जयंती ‘समाज दिन’ म्हणून विविध कार्यक्रमांनी साजरी केली जाते. या निमित्ताने संस्थेच्या
विविध शाखांमध्ये कर्मवीर सप्ताह साजरा करण्यात येतो. २०२० चा ‘कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे समाज परिवर्तन गौरव पुरस्कार’ यावर्षी बार्शीचे सुपुत्र ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले यांना जाहीर झाल्याची माहिती सांस्कृतिक विभागप्रमुख जयकुमार शितोळे यांनी दिली.
या पत्रकार परिषदेस संस्थेचे सचिव व्ही. एस. पाटील, सहसचिव पी. टी. पाटील, खजिनदार प्रा. दिलीप रेवडकर, चंद्रकांत मोरे, बी. आर. भालके उपस्थित होते. कोरोनामुळे संस्थेच्या विविध स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जात आहेत. वक्तृत्व, निबंध, कथाकथन, रांगोळी, चित्रकला, गीतगायन, नृत्य, बुद्धिबळ इत्यादी स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना त्यांच्या गावी सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व पुस्तक पाठविण्यात येणार आहे. ३ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता संस्थेतील सेवानिवृत्तांचा सत्कार केला जाणार आहे.
जागतिक स्तरावरील शिक्षणक्षेत्रातील ग्लोबल टीचर अवॉर्ड हा सर्वोच्च पुरस्कार मिळविणारे रणजितसिंह डिसले यांना सन २०२० चा ‘कर्मवीर डाॅ. मामासाहेब जगदाळे समाज परिवर्तन गौरव पुरस्कार’ संस्थेने जाहीर केला आहे. राेख २५,०००, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार ४ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता कर्मवीर जयंतीच्या मुख्य कार्यक्रमावेळी प्रदान केला जाणार आहे. वीरमाता, वीरपत्नी यांचा सत्कार तसेच रणजितसिंह डिसले यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
----फोटो रणजितसिंह डिसले आणि जगदळेमामा यांचा आयडी फोटो