राऊत-सोपल गटाच्या मनोमिलनामुळेच मालवंडी बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:20 IST2021-01-17T04:20:42+5:302021-01-17T04:20:42+5:30

गावच्या विकासासाठी आमदार राजेंद्र राऊत गटाचे बाबा काटे व माजी आमदार दिलीप सोपल गटाचे श्रीमंत थोरात यांच्यात मनोमिलन झाले. ...

Malwandi unopposed due to the Raut-Sopal group's mindset | राऊत-सोपल गटाच्या मनोमिलनामुळेच मालवंडी बिनविरोध

राऊत-सोपल गटाच्या मनोमिलनामुळेच मालवंडी बिनविरोध

गावच्या विकासासाठी आमदार राजेंद्र राऊत गटाचे बाबा काटे व माजी आमदार दिलीप सोपल गटाचे श्रीमंत थोरात यांच्यात मनोमिलन झाले. त्यानंतर गावाच्या विकासासाठी व गावात शांतता राहण्यासाठी यंदा ग्रामपंचायत निवडणूक एकत्र बसून बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. त्यास गावकऱ्यांनीदेखील साथ दिल्ली.

११ सदस्य संख्या असलेली वैराग भागातील ही मोठी ग्रामपंचायत जाते.

मागील दोन निवडणुकांपासून या ग्रामपंचायतीवर जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत थोरात व माजी पंचायत समिती सदस्य बाबा काटे या दोन गटांची आलटून-पालटून सत्ता येत होती. यंदा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून बिनविरोध करण्याची गावात चर्चा होती. त्याला गावातील बुजुर्ग मंडळी सेवानिवृत्त डीवायएसपी रामभाऊ थोरात, सेल टॅक्स अधिकारी राजेंद्र सरवदे, सोसायटीचे माजी चेअरमन धन्यकुमार साखरे, प्रगतशील बागायतदार भारत होनराव, अनिल पाटील, महेश साखरे, अमोल दहीवडकर, दादासाहेब खंडागळे यांनी साथ दिली.

तसेच आमदार राजेंद्र राऊत यांनीही ग्रामपंचायत निवडणुका जास्तीत जास्त संख्येने बिनविरोध करा, असे आवाहन केले होते.

यामध्ये अर्ज दाखल केलेले हनुमंत कानडे, उत्तम थोरात, श्रीकांत बिडकर, सागर बिडकर, अनिल गवसाने, मनोज राजगुरु यांनी माघार घेतली. त्यामुळे रामभाऊ घेवारे, हनुमंत होनमाने, नवनाथ गवळी, विष्णू चव्हाण, लहू काटे, संतनाथ खंडागळे, पूजा नरुटे, शैनाबी मुजावर, मंदाकिनी कावरे, अरुणा कुलकर्णी, संध्या होनराव हे गावकऱ्यांनी निवडलेले ११ सदस्य बिनविरोध निवडून आले.

Web Title: Malwandi unopposed due to the Raut-Sopal group's mindset