पंढरपूरला टूरिस्ट डेस्टिनेशन बनविणार
By Admin | Updated: September 30, 2015 13:17 IST2015-09-30T13:17:22+5:302015-09-30T13:17:22+5:30
पंढरपूरला टूरिस्ट डेस्टिनेशन करण्याच्या दृष्टीने येथील सर्व विकासकामे सुरु आहेत. त्यासाठी पंढरपूरची स्वच्छता, ४३ कोटी रुपयांचे भक्तनिवास, नदीकाठी ६५ एकर परिसरात

पंढरपूरला टूरिस्ट डेस्टिनेशन बनविणार
>पंढरपूर : पंढरपूरला टूरिस्ट डेस्टिनेशन करण्याच्या दृष्टीने येथील सर्व विकासकामे सुरु आहेत. त्यासाठी पंढरपूरची स्वच्छता, ४३ कोटी रुपयांचे भक्तनिवास, नदीकाठी ६५ एकर परिसरात दोन-तीन निवासी कक्ष ही कामे पुढील आषाढी यात्रेच्या आतच पूर्ण होतील, अशी माहिती जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिली.
कार्तिकी यात्रेच्या नियोजनासंदर्भात ते आज पंढरपुरात आले होते, त्यावेळी बोलत होते. यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने, पंढरपूरचे प्रांताधिकारी संजय तेली उपस्थित होते. जिल्हाधिकारी मुंढे म्हणाले की, सध्या पंढरपुरात तीर्थक्षेत्र विकास आराखडांतर्गत सुमारे ५३ कोटी रुपयांचे तीन महत्त्वाचे रस्ते तयार करण्यात येत आहेत. त्यामध्ये गजानन महाराज मठ ते भक्ती मार्ग हा साडेसातशे मीटरचा रस्ता ६ कोटी ४८ लाख, एमटीडीसी भक्तनिवास ते सांगोला चौक ते मध्यप्रदेश भक्तनिवास पर्यंतचा एकोणीसशे मीटरचा रस्ता २४ कोटी ९ लाख तर संतपेठ-महात्मा फुले पुतळा ते गोपाळपूर हा अठराशे मीटरचा रस्ता २३ कोटी ५२ लाख रुपयांत करण्याचे काम सुरु असून, कामे प्रगतिपथावर आहेत. याशिवाय नगरोत्थान योजनेच्या ५२ कोटी रुपयांतून आणखी महत्त्वाचे आठ रस्ते प्रगतिपथावर आहेत. (प्रतिनिधी)