शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर झेडपीच्या सीईंओंची मोठी कारवाई; त्या शिक्षकाची बदली अखेर रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 12:19 IST

शिक्षक संघटनांतून व्यक्त होत होता संताप; शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांच्या अडचणीत वाढ

सोलापूर - नेहरू वसतिगृहाचा पदभार देण्यासाठी अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव येथे नियुक्तीस असलेल्या शिक्षकाची सोलापुरातील मजरेवाडी शाळेत पद नसताना केलेली बदलीसोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी शुक्रवारी रद्द केली आहे. या चुकीच्या बदलीनेशिक्षक संघटनांतून व्यक्त होत असलेल्या संतापाची सीईंओंनी दखल घेतल्याने प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

शिक्षण अधिकारी संजयकुमार राठोड यांनी ३० जून रोजी गौडगावच्या पाटीलवस्ती शाळेतील उपशिक्षक एस. पी. चव्हाण यांची लोकमान्यनगर झेडपी शाळेत बदली केली आहे. पहिली ते पाचवीपर्यंत असलेल्या या शाळेचा चालूवर्षाचा पट फक्त ४० आहे. त्यामुळे येथे दोनच शिक्षकांची नियुक्ती नियमानुसार असताना चव्हाण यांची बेकायदेशीरपणे पदस्थापना करण्यात आल्याचे जुनी पेन्शन हक्क संघटनेचे प्रशासक राजू कोळी म्हटले होते. तर लोकमान्यनगर शाळेवर चव्हाण यांची केलेली बदली तातडीने रद्द करावी, अशी मागणी सोलापूर जिल्हा प्रा. शिक्षक संघांचे अध्यक्ष शिवानंद भरले यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे केली होती. ठराविक शिक्षकांची सोय करण्यासाठी शिक्षण विभाग काहीही करते, असा समज शिक्षकांत निर्माण झाला आहे. ऑनलाइन बदल्यात ४० महिला शिक्षिका विस्थापित झाल्या आहेत. असे असताना सोयीची नियुक्ती देणे सयुक्तिक होणार नाही असे शिवानंद भरले यांनी म्हटले होते. 

लोकमत चा पाठपुरावा यशस्वी

गौडगाव येथील पाटील वस्ती शाळेचे शिक्षक चव्हाण यांची सोय लावण्यासाठी सोलापुरातील लोकमान्य नगर शाळेत केलेली बदली कशी बेकायदेशीर आहे, याबाबत लोकमत ने गेल्या दोन दिवसांपासून वृत्त प्रकाशित करून पाठपुरावा केला होता. याची दखल घेत शुक्रवारी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी चव्हाण यांची बदली रद्द करण्याचा आदेश जारी केला. यामुळे लोकमत च्या बातमीला यश मिळाल्याचे शिक्षक संघटनांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदTeacherशिक्षकTransferबदली