कुर्डुवाडी नगरपरिषदेच्या विषय समितीवर महिलाराज; ऑनलाइन झाली विशेष सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 05:12 PM2021-01-06T17:12:23+5:302021-01-06T17:15:02+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक झूम मिटिंगद्वारे आयोजित करण्यात आली होती

Mahilaraj on the subject committee of Kurduwadi Municipal Council; A special meeting was held through the zoom meeting | कुर्डुवाडी नगरपरिषदेच्या विषय समितीवर महिलाराज; ऑनलाइन झाली विशेष सभा

कुर्डुवाडी नगरपरिषदेच्या विषय समितीवर महिलाराज; ऑनलाइन झाली विशेष सभा

googlenewsNext

कुर्डुवाडी :  कुर्डूवाडी शहराचे लक्ष लागून राहिलेल्या नगर परिषदेच्या स्थायी व चार विषय समित्यांची निवडणूक बुधवारी पार पडली.सर्व विषय समित्यांवर सत्ताधारी शिवसेनेच्या  गटाचेच वर्चस्व राहिले असून निवडणूक बिनविरोध जाहीर झाली आहे.यावेळी झालेल्या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी पिठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार राजेश चव्हाण हे उपस्थित होते. त्याला सहाय्यक म्हणून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी काम पाहिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक झूम मिटिंगद्वारे आयोजित करण्यात आली होती. त्याला सर्व नगरसेवकांनी सहभाग नोंदवित आपले मत व्यक्त केले.       

विषय समिती व स्थायी समितीवर निवड झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे- सार्वजनिक बांधकाम नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी बबन लक्ष्मण बागल तर सदस्यपदी वनिता सातव,अनिता साळवे,निवृत्ती गोरे, आनंद टोणपे यांची निवड करण्यात आली. याबरोबरच सार्वजनिक आरोग्य ,वैद्यकिय आणि महिला बालकल्याण समिती सभापतीपदी राधिका मनोज धायगुडे यांची तर सदस्यपदी  नंदा वाघमारे,जनाबाई चौधरी,आयुब मुलाणी,शांता पवार यांची निवड झाली.तर पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी दमयंती दिलीप  सोनवर यांची तर सदस्यपदी अनिता साळवे,जनाबाई चौधरी,संजय गोरे,शहनाज मुलाणी यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

   याबरोबरच शिक्षण समितीवर सभापती म्हणून पदसिध्द उपनगराध्यक्षा उर्मिला हरिदास बागल यांची तर सदस्यपदी नंदा वाघमारे,वनिता सातव,अरुण काकडे,शांता पवार यांची निवड झाली आहे.तर स्थायी समिती सभापतीपदी नगराध्यक्ष समीर मुलाणी यांची तर सदस्यपदी सर्व विषय समिती सभापतींची निवड करण्यात आली.यावेळी नगरपरिषद कार्यालयातून झूम मिटिंगचे कामकाज नगराध्यक्ष समीर मुलाणी,मुख्याधिकारी समीर भूमकर,अतुल शिंदे,रवींद्र भांबुरे,नितीन आखाडे यांनी पाहिले. यावेळी झूम मिटींगला नगरसेवक धनंजय डिकोळे, प्रकाश गोरे, आनंद टोणपे, निवृत्ती गोरे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. 

 

Web Title: Mahilaraj on the subject committee of Kurduwadi Municipal Council; A special meeting was held through the zoom meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.