शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला, सरपंच गायकवाडची तुरुंगात रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 19:59 IST

माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक येथे गुरुवारी महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी प्रमुख आरोपी सरपंच मनोज अप्पाराव गायकवाड याच्यासह 8 आरोपींना पोलिसांनी शुक्रवारी (दि. 16) बेड्या ठोकल्या आहेत. या सर्व आरोपींना सोमवार, दि. 19 पर्यत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.  

सोलापूर : माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक येथे गुरुवारी महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी प्रमुख आरोपी सरपंच मनोज अप्पाराव गायकवाड याच्यासह 8 आरोपींना पोलिसांनी शुक्रवारी (दि. 16) बेड्या ठोकल्या आहेत. या सर्व आरोपींना सोमवार, दि. 19 पर्यत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.          उपळाई बुद्रुक येथील सरपंच मनोज अप्पाराव गायकवाड व त्याच्या इतर साथीदारांनी दि.15 रोजी महावितरणचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता रमेश चव्हाण, सहायक अभियंता प्रेमनाथ चव्हाण, तंत्रज्ञ शिवाजी यमलवाड, अक्षय सलगर, राजकुमार हजारे, उपयंत्रचालक अतुल हरणे,बाह्यस्रोत कर्मचारी भास्कर सुतार यांना अमानुषपणे बेदम मारहाण केली. या मारहाणीत महावितरणचे सातही अभियंते व कर्मचारी जबर जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी उपळाईचा सरपंच मनोज अप्पाराव गायकवाड व त्याचे साथीदार लक्ष्मण चांगदेव जाधव, बाळू विठ्ठल माळी, सिद्धेश्वर अप्पाराव शेलार, शंकर शिवाजी गोरे, पप्पू महादेव डुचाळ, ज्ञानदेव चांगदेव राऊत, बाळू तुकाराम डुचाळ व सुनील क्षीरसागर यांचा मुलगा अशा एकूण 9 आरोपींविरुद्ध भा.दं.वि.च्या कलम 353, 332, 143, 147, 149, 504 व 506 अन्वये गुन्हा दाखल केला.           उपळाई बुद्रुक येथील मारहाण प्रकरणाची महावितरण व्यवस्थापनाने गंभीर दखल घेत सर्व आरोपींना ताबडतोब अटक करून कठोर कारवाईची मागणी पोलिस प्रशासनाकडे केली. आरोपींच्या अटकेसाठी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी माढा पोलिस ठाण्यात गुरुवारी ठाण मांडून होते. यासोबतच जिल्हा पोलिस अधीक्षक एस. वीरेश प्रभू यांनीही आरोपींविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिस यंत्रणेने या सर्व आरोपींना अटक करण्यासाठी गुरुवारी शोध मोहीम सुरु केली. यात शुक्रवारी (दि. 16) सकाळच्या सुमारास प्रमुख आरोपी व उपळाईचा सरपंच मनोज अप्पाराव गायकवाड याच्यासह लक्ष्मण चांगदेव जाधव, बाळू विठ्ठल माळी, सिद्धेश्वर अप्पाराव शेलार, शंकर शिवाजी गोरे, पप्पू महादेव डुचाळ, ज्ञानदेव चांगदेव राऊत, बाळू तुकाराम डुचाळ या आरोपींना माढा ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल भोस यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या व गजाआड केले.

टॅग्स :ArrestअटकSolapurसोलापूर