शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
3
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
4
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
5
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
6
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
7
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
8
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
9
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
10
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
11
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
12
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
13
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
14
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
15
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
16
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
17
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
18
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
19
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
20
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…

महावितरणच्या लाच खोर अभियत्यांकडे कोट्यावधी रुपयांची मालमत्ता, चालु वर्षात सहा लाचखोर अटकेत, सोलापूर लाचलुचपत विभागाची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 13:16 IST

पंढरपूर येथील महावितरणच्या लाचखोर सहायक  अभियंता संतोष सोनवणे याला सहकाºया सोबत १५ हजार रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत विभागाने रंगहात पकडले होते.

ठळक मुद्दे बँक खात्याची चौकशी सुरु असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी अरुण देवकर यांनी दिली़सोनवणेच्या पोलीस कोठडीत वाढचालु वर्षोत सहा लाचखोर अटकेत

अमित सोमवंशीसोलापूर दि ३ :  पंढरपूर येथील महावितरणच्या लाचखोर सहायक  अभियंता संतोष सोनवणे याला सहकाºया सोबत १५ हजार रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत विभागाने रंगहात पकडले होते. चौकशी दरम्यान, सोनवणे याच्याकडे १ कोटी ६० लाख रुपयांची मालमत्ता सापडली असून त्याच्या बँक खात्याची चौकशी सुरु असल्याची माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी अरुण देवकर यांनी दिली़करकंब येथील वीज वितरणचे आॅपरेटर चंद्रकांत परशुराम जाधव यांची खातेनिहाय चौकशी सुरू होती. या चौकशीमध्ये दोन वार्षिक वेतनवाढ रोखण्यात आल्या होत्या. ही शिक्षा कमी करण्यासाठी व निलंबनाचा कालावधी संपुष्टात आणण्यासाठी १५ हजार रूपयांची लाच घेताना सहाय्यक अभियंता संतोष सोनवणे यास ३० जानेवारी रोजी अटक केली होती.  त्यानंतर सहायक पोलीस आयुक्त अरुण देवकर आणि त्यांच्या पथकाने सोनवणे यांच्या मालमत्तेची माहिती घेतली असता त्याच्या कडे पंढरपूरात तब्बल १ कोटी ६० लाख रुपयांची मालमत्ता सापडली असून त्याने दुसरी कडे  मालमत्ता खरेदी केली आहे का, याचा शोध सुरु असल्याचे देवकर यांनी सांगितले.----------------सोनवणेच्या पोलीस कोठडीत वाढआरोपी सोनवणे यापूर्वी घेतलेले ४० हजार रूपये हस्तगत करावयाचे आहेत, याशिवाय अन्य मालमत्ता तपासणीसाठी पोलीस कोठडीची मागणी सरकारी पक्षातर्फे करण्यात आली.  न्यालयाने सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन सोनवणेला आणखी  तीन दिवसाची पोलीस कोठडी वाढवून दिली.  सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. सारंग वांगीकर तर आरोपीतर्फे अ‍ॅड. एन. डी. जोशी, अ‍ॅड. टी. यु. सरदार यांनी काम पाहिले.--------------चालु वर्षोत सहा लाचखोर अटकेतलाचखोर अधिकारी व कर्मचाºयांना पर्दाफाश करण्याची जबाबदारी शासनाने लाचलुपत प्रतिबंधक विभागाकडे सोपविली आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात लाचखोर पकडण्याच्या संख्येत दिवसेदिवस वाढ होत चालली आहे. तर चालु वर्षेत सहा जणांना लाच घेतांना पकडले. त्यात वर्ग दोनच्या दोन अधिकाºयांचा समावेश असल्याचे सहायक पोलीस आयुक्त अरुण देवकर यांनी सांगितले.---------------लाचखोराविरुध्द तक्रार करणे सोपेएसीबीच्या कारवाईसाठी नागरिकांचा प्रतिसाद महत्वाचा आहे, हे ओळखुन टोल फ्री क्रमांक, आॅनलाईन तक्रारी घेणे सुरु केले आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील युनिटला दोन मोबाईल दूरध्वनी क्रमांक, व्हॉटसअ‍ॅप नंबर जनतेच्या संपर्कासाठी उपलब्ध करुन दिले. त्यामुळे जिल्ह्यातील कानाकोपºयातील नागरिकांना लाचखोराविरुध्द तक्रार करणे सुलभ झाले आहे. त्यामुळे लाचखोरांच्या तक्रारीत वाढ झाली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग