महाविकास आघाडीच्या हालचाली; शेकाप स्वतंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:26 IST2021-09-14T04:26:33+5:302021-09-14T04:26:33+5:30

सांगोला नगरपालिकेची स्थापना १८५६ मध्ये झाली आहे. प्रभाग ऐवजी वार्डनिहाय होणार आहेत. त्यामुळे २० नगरसेवक निवडून दिले जाणार ...

Mahavikas Aghadi movements; Shekap independent | महाविकास आघाडीच्या हालचाली; शेकाप स्वतंत्र

महाविकास आघाडीच्या हालचाली; शेकाप स्वतंत्र

सांगोला नगरपालिकेची स्थापना १८५६ मध्ये झाली आहे. प्रभाग ऐवजी वार्डनिहाय होणार आहेत. त्यामुळे २० नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. त्यादृष्टीने शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस (आय), आनंद माने गट, भाजप निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. असे असले तरी राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे तोच फाॅर्म्युला सांगोला नगरपालिकेसाठी ठेवून शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस एकत्रित निवडणुका लढविण्याची शक्यता आहे. शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. पी.सी. झपके निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. तर शेकाप पक्षाने कार्यकर्ता बैठक घेऊन निवडणुकीची व्यूहरचना आखली आहे. अशा परिस्थितीत आनंद माने गट व भारतीय जनता पार्टी नेमकी काय भूमिका घेणार किंवा शेकापशी त्यांची आघाडी होणार का, हे पाहावे लागणार आहे.

Web Title: Mahavikas Aghadi movements; Shekap independent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.