भाजपाविरुद्ध महाविकास आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:26 IST2021-09-14T04:26:29+5:302021-09-14T04:26:29+5:30
अक्कलकोट नगरपालिकेत सध्या भाजपच्या नगराध्यक्षा आहे. भाजपाचे १५ नगरसेवक, काँग्रेसचे ८ नगरसेवक आहेत. सतत भाजपाची सत्ता असतानाही काँग्रेसनेही प्रयत्न ...

भाजपाविरुद्ध महाविकास आघाडी
अक्कलकोट नगरपालिकेत सध्या भाजपच्या नगराध्यक्षा आहे. भाजपाचे १५ नगरसेवक, काँग्रेसचे ८ नगरसेवक आहेत. सतत भाजपाची सत्ता असतानाही काँग्रेसनेही प्रयत्न सोडले नाही. सध्या काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. मात्र, स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार दिल्यास महाविकास आघाडी होण्याची शक्यता आहे. सर्व पक्ष स्वतंत्र निवडणूक लढल्यास भाजपला पुन्हा संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरात खेडगी परिवाराला मानणारा गटही मोठा आहे. त्यांना भाजपाकडून उमेदवारी न मिळाल्यास त्यांची एकला चलो रे ची भूमिका राहण्याची शक्यता आहे. त्याचाच फायदा काँग्रेस उठविण्याच्या तयारीत आहे. शिवसेना, राष्ट्रवादीकडूनही तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आगामी निवडणूक भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी अशी होणार की स्वतंत्र लढणार येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.