शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात

By रवींद्र देशमुख | Updated: April 30, 2024 12:52 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: पंधरा वर्षापूर्वी माढ्यातून निवडणूक लढविताना एका नेत्यानं मावळत्या सूर्याच्या साक्षीनं पाणी देण्याचे वचन दिलं होतं. मात्र, दिलेलं वचन न पाळणाऱ्या नेत्याला आता धडा शिकविण्याची वेळ आली आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर नाव न घेता केली.

- रवींद्र देशमुख सोलापूर - पंधरा वर्षापूर्वी माढ्यातून निवडणूक लढविताना एका नेत्यानं मावळत्या सूर्याच्या साक्षीनं पाणी देण्याचे वचन दिलं होतं. मात्र, दिलेलं वचन न पाळणाऱ्या नेत्याला आता धडा शिकविण्याची वेळ आली आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर नाव न घेता केली.

माढा लोकसभेतील महायुतीचे उमदेवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ माळशिरसमध्ये आयोजित सभेत मोदींनी पवारांवर टीका केली. नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, ६० वर्षांपूर्वी गरिबी हटविण्याचा नारा काँग्रेसने दिला होता. गरिबी.. गरिबी.. म्हणत जप करत होते. मात्र, गरिबी काय हटली नाही. दहा वर्षांपूर्वी येथील नेत्यांना कृषी मंत्री बनविले होते. तेव्हा ऊसाची एफआरपी २०० रुपये होती. आता तीच एफआरपी ३५० पर्यंत पोहोचली आहे. इथेनॉलच्या उत्पादनात वाढ झाली आहे. शेतकऱ्यांच्या  नावावर केवळ राजकारण करीत राहिले.  विकासांकडे आणि शेतीमालाच्या दराकडे दुर्लक्ष केले, असेही ते म्हणाले.

'इंडी' आघाडीमध्ये ताळमेळ नाही. काँग्रेसकडे जवळपास २०० ते २५० जागांसाठी उमेदवार मिळाले नाहीत. मतांच्या राजकारणासाठी काँग्रेसने राम मंदिर बांधलं नाही, अशा लोकांना जनता धडा शिकवेल, असे मोदी म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४madha-pcमाढाNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRanjitsingh Nimbalkarरणजितसिंह निंबाळकरSharad Pawarशरद पवार