सोमशेखर जमशेट्टी यांच्यामुळे महाराष्ट्र कन्नड साहित्य परिषदेला नवचैतन्य मिळेल : लिगाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:20 IST2021-04-19T04:20:24+5:302021-04-19T04:20:24+5:30
बऱ्हाणपूर: कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही शासनाच्या योजना गरजूपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारे युवा साहित्यिक सोमशेखर जमशेट्टी यांच्यामुळे ...

सोमशेखर जमशेट्टी यांच्यामुळे महाराष्ट्र कन्नड साहित्य परिषदेला नवचैतन्य मिळेल : लिगाडे
बऱ्हाणपूर: कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही शासनाच्या योजना गरजूपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारे युवा साहित्यिक सोमशेखर जमशेट्टी यांच्यामुळे महाराष्ट्र कन्नड साहित्य परिषदेला नवचैतन्य मिळेल, असे प्रतिपादन सोलापूरच्या ज्येष्ठ कन्नड साहित्यिका डॉ.मधूमाल लिगाडे यांनी व्यक्त केले. कन्नड साहित्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक लागली आहे. कन्नड साहित्य परिषद महाराष्ट्र घटकांच्या राज्याध्यक्षपदासाठी अक्कलकोट येथील युवा साहित्यिक सोमशेखर जमशेट्टी निवडणूक लढवीत आहे. यांच्या प्रचारार्थ सोलापूर येथे आयोजित कन्नड साहित्यिकांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. दरम्यान, डॉ. मधुमाल लिगाडे यांच्या हस्ते युवा साहित्यिक सोमशेखर जमशेट्टी यांचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. मैंदर्गीचे साहित्यिक गिरीश जाकापुरे यांनी महाराष्ट्राच्या सर्व सुज्ञ मतदारांनी जमशेट्टी यांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे.
यावेळी मलिकजान शेख, शरणप्पा फुलारी, विद्याधर गुरव, महेश म्हेत्री, कल्मेश अडळट्टी, सदाशिव कोळी, शरणबसप्पा बिराजदार, बसवराज धानशेट्टी, चिदानंद मठपती, कल्याणी गंगोंडा, बसवराज उण्णद, धरेप्पा तोळनुरे, शिवशरण म्हेत्रे, मृत्युंजय कल्याणी, शरणु कोळी, बिरेश खोती यांच्यासह आदिजन उपस्थित होते. (वा. प्र.)
---
फोटो : १७ विजय विजापुरे
सोमशेखर जमशेट्टी यांचा जाहीरनामा प्रकाशित करताना कन्नड साहित्यिका डॉ.मधूमाल लिगाडे, मलिकजान शेख, शरणप्पा फुलारी, विद्याधर गुरव, महेश म्हेत्री.