शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

महाडिकांच्या ताब्यातील भिमा कारखान्यामधील साखरेची विक्री दि महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बँक करणार!

By विठ्ठल खेळगी | Updated: March 21, 2023 13:39 IST

भाजपचे खासदार धनंजय महाडिकांच्या ताब्यातील कारखान्यातील साखरेची विक्री होणार असल्याचे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

सोलापूर : मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याकडे असणाऱ्या राज्य सहकारी बँकेच्या थकीत कर्जापोटी ते कर्ज वसूल करण्यासाठी दि महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बँकेने जप्त करुन ताब्यात घेतलेल्या ८२ हजार ५४३ क्विंटल साखरेची विक्री मंगळवार दि.२१ मार्च रोजी पुणे येथे करणार असल्याची निविदा नोटीस भिमा सह साखर कारखान्याला काढली आहे. भाजपचे खासदार धनंजय महाडिकांच्या ताब्यातील कारखान्यातील साखरेची विक्री होणार असल्याचे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

बँकेने  कारखान्याला  काढलेल्या नोटीसामध्ये नमूद केले आहे की, निविदा फॉर्म दिनांक १४ मार्च ते २० मार्च २०२३ पर्यंत भरावयाच्या असून , मालमत्ता पाहण्याची तारीख १६ मार्च २०२३ ते १७ मार्च २०२३ पर्यंत आहे. निविदा प्रादेशिक कार्यालय पुणे येथे दाखल करण्याची अंतिम तारीख २० मार्चपर्यंत असून निविदा उघडण्याची तारीख २१ मार्च रोजी दुपारी दोन वाजता प्रादेशिक कार्यालय पुणे येथे उघडण्यात येणार आहे. राज्य बँक तारणातील ८२ हजार ५४३ क्विंटल साखर पोती सरफेसी कायदा कलम १३ (११) नियम ४ (३) नुसार ''जेथे आहे जशी आहे त्या परिस्थितीत विकणार आहे. वैधानिक नोटीस कर्जदारास सरफेसी कायदा २००२ अन्वये वैधानिक ३० दिवसाची साखर विक्री नोटीस दि.०४.१२.२०२१ अन्वये देण्यात आली आहे.

कारखान्याने राज्य बँकेचे थकीत कर्ज फेडले नाही म्हणून बँकेने कर्जाची वसुली करण्यासाठी या अगोदरही साखरेची विक्री करण्याची नोटीस काढली होती. यानंतर पुन्हा आता दुसरी नोटीस काढली असून सन २०१७ - १८ सालातील २८ हजार ७१२ क्विटल व सन २०१८-१९ सालातील ५३ हजार ८७१ अशी एकूण ८२ हजार ५४३ क्विंटल साखर २९६० रूपये प्रतिक्विटल दराने विक्री करण्याची नोटीस काढली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखाने