महानंदा खेडगीकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:21 IST2021-04-17T04:21:44+5:302021-04-17T04:21:44+5:30

सोलापूर : महानंदा सिद्राम खेडगीकर (५८, रा. विशाल नगर, जुळे सोलापूर ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन ...

Mahananda Khedgikar passes away | महानंदा खेडगीकर यांचे निधन

महानंदा खेडगीकर यांचे निधन

सोलापूर : महानंदा सिद्राम खेडगीकर (५८, रा. विशाल नगर, जुळे सोलापूर ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. महानगर पालिकेचे माजी कर आकारणी प्रमुख सिद्राम खेडगीकर यांच्या पत्नी होत.

राचव्वा कलशेट्टी

सोलापूर : राचव्वा इरण्णा कलशेट्टी (७४, रा. भवानीपेठ ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पुण्यातील उद्योजक मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या त्या मातोश्री होत.

पवनसिंग चौहान

सोलापूर : पवनसिंग दत्तूसिंग चौहान (४६, रा. युनायटेड विहार, मुरारजी पेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ व वडील असा परिवार आहे. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते कर्मचारी होते.

नागप्पा सरसंबी

सोलापूर : नागप्पा दरेप्पा सरसंबी (१००, रा. विराट नगर, मजरेवाडी) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

शिवशरण हाचडे

सोलापूर : शिवशरण ए. हाचडे (७१, रा. शुक्रवार पेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते सिद्धेश्वर प्रशालेचे माजी गणित शिक्षक होत.

एन. बी. पारसनीस

सोलापूर : डॉ. एन. बी. पारसनीस (८५, रा. नाथ पॅरॉगॉन, लष्कर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

खतीजाबी शेख

सोलापूर : खतीजाबी अहमद हुसेन शेख (९२, रा. दंडोती गल्ली, चौपाड) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. विक्रीकर अधिकारी हाजी नूरअहमद अहमद हुसेन शेख यांच्या त्या मातोश्री होत.

Web Title: Mahananda Khedgikar passes away