'महादेव जानकरांना नंदी बैलावरून फिरवणार'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 19:13 IST2018-06-18T19:11:47+5:302018-06-18T19:13:41+5:30
उसाचे पाच हजार कोटी भेटले नाहीत. दुधाचे भाव कमी झाले. महादेव असताना दुधाचे भाव कसे कमी झाले.

'महादेव जानकरांना नंदी बैलावरून फिरवणार'
सोलापूर : महादेव असताना दुधाचे भाव कसे कमी झाले, असा प्रश्न उपस्थित करतानाच महादेवाचे वाहन असलेल्या नंदीबैलावर महादेव जानकर यांना फिरवू, असा इशारा प्रहार संघटनेचे अध्य़क्ष तथा आमदार बच्चू कडू यांनी दिला. दिव्यांगांच्या निधी वितरणाबाबत आढावा घेण्यासाठी कडू आज सोलापूर महापालिकेत आले होते. ते म्हणाले, उसाचे पाच हजार कोटी भेटले नाहीत. दुधाचे भाव कमी झाले. महादेव असताना दुधाचे भाव कसे कमी झाले. महादेवाचे वाहन नंदीबैल आहे. दुधाला योग्य भाव न मिळाल्यास नंदीबैलावरूनच जानकर यांना फिरवण्यात येईल.