शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मोहिते-पाटील पुन्हा शरद पवारांसोबत येणार? रामराजे निंबाळकर, जयंत पाटील यांच्यात बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 09:30 IST

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने राज्यातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत २० उमेदवारांची नावे आहेत. माढा लोकसभा मतदार संघात पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Sharad Pawar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने राज्यातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत २० उमेदवारांची नावे आहेत. माढा लोकसभा मतदार संघात पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे,  यामुळे आता धैर्यशील मोहिते पाटील नाराज असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत, दरम्यान काल दुपारी अकलूज येथील मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर नेत्यांची बैठकही झाली आहे. या बैठकीत अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर, शेकापचे जयंत पाटील, शिवसेनचे माजी जिल्हाध्यक्ष संजय कोकाटे उपस्थित होते.

शिवसेना २२, काँग्रेस १६, राष्ट्रवादी १०; असे आहे महाविकास आघाडीतील संभाव्य जागावाटप

माढा लोकसभा मतदार संघातून यावेळी धैर्यशील मोहिते पाटील इच्छुक होते, पण यावेळी पु्न्हा एकदा भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे मोहिते पाटील नाराज असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे काल रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह अन्य नेत्यांनी मोहिते पाटलांसोबत बैठक घेतली. यामुळे आता पुन्हा एकदा मोहिते पाटील यांच्यासह रामराजे नाईक निंबाळकर खासदार शरद पवार यांच्यासोबत येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. काल झालेल्या बैठकीत उमेदवारी कोणाला द्यायची याबाबत चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, काही नेत्यांनी मोहिते पाटलांनी शरद पवार यांच्या पक्षातून उमेदवारी घ्यावी अशी मागणी केली आहे.

यावेळी माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष संजय कोकाटे म्हणाले, धैर्यशील मोहिते पाटील यांनी खासदार शरद पवार यांच्या पक्षाकडून लढावं. माझी अपेक्षा आहे मोहिते पाटलांनी 'तुतारी' हातात घ्यावी. मी शिवसेनेचा राजिनामा दिला आहे. भाजपच्या विरोधातील उमेदवार हा शरद पवार यांच्या पक्षाचा असणार, असंही कोकाटे म्हणाले. 

अकलूज येथील झालेल्या बैठकीत शेकापचे जयंत पाटील उपस्थित होते, जयंत पाटील यावेळी म्हणाले, आजच्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा केलेली नाही. पण, ही अकलुजची भूमीने राजकीय घडामोडींना कलाटणी देण्याची कामगिरी या भूमीने केली आहे. ती यापुढेही व्हावे अशी माझी अपेक्षा आहे.

रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, राजकीयदृष्या बैठकीत कोणतीही चर्चा झालेली नाही. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या तब्येतीची चौकशी केली, असंही नाईक निंबाळकर म्हणाले. 

गिरीष महाज यांनी मोहिते पाटलांची भट घेतली

भाजपचे नेते गिरीष महाजन यांनी काल रात्रीच धैर्यशील मोहिते पाटील यांची भेट घेतली. यावेळी अकलूजमध्ये त्यांच्या गाडीसमोर कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. गिरीष महाजन म्हणाले, पक्ष मोठा झाला की पक्षात मत मतांतर होत असतात. दादांचा शब्द आमच्यासाठी मोठा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मला आज इकडे पाठवले आहे, आमच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे, असंही महाजन म्हणाले.   

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस