शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Madha Lok Sabha Election: पश्चिम महाराष्ट्राच राजकारण बदलणार! २००४ नंतर पहिल्यांदाच बडे नेते एकत्र; शरद पवार अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 23:12 IST

Madha Lok Sabha Election: धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशा आधी खासदार शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील यांच्या 'शिवरत्न' या निवासस्थानी सकाळी भोजन करणार आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघात जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. भाजपाने माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी झाल्यानंतर अकलूजचे धैर्यशील मोहिते पाटील नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यानंतर आता मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आता उद्या रविवारी १४ एप्रिल रोजी २००४ नंतर पहिल्यांदाच तीन बडे नेते एकत्र येणार आहेत.  

मंडीतून कंगना रणौत विरोधात विक्रमादित्य सिंह! काँग्रेसकडून लोकसभेसाठी १६ उमेदवारांची यादी जाहीर

धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशा आधी खासदार शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील यांच्या 'शिवरत्न' या निवासस्थानी सकाळी भोजन करणार आहेत. हे दिग्गज नेते पुन्हा एकत्र येणार आहेत, यामुळे आता सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात बदल होणार असल्याच्या चर्चा जोरदार सुरू आहेत. 

उद्या धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादीतील शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. तर दुसरीकडे उद्या सकाळी ११ वाजता सुशीलकुमार शिंदे आणि खासदार शरद पवार अकलूजमध्ये येणार आहेत. या दिग्गज नेत्यांच्या भेटीमुळे सोलापूर, माढा लोकसभा मतदारसंघात मोठ्या घडामोडी घडू शकतात, अशा चर्चा सुरू आहेत. 

धैर्यशील मोहिते पाटलांचा उद्या पक्षप्रवेश

धैर्यशील मोहिते पाटील उद्या ४ वाजता राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे आता माढा लोकसभा मतदारसंघातील समीकरण बदलणार असल्याचे बोलले जात आहे. 

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांची टीका

उद्या अकलूजमध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी शरद पवार, सुशील कुमार येणार आहेत, यावरुन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी टीका केली. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले,  'काही लोक न बोलावतात जातात, तर काही काही मुद्दाम बोलावतात. त्याचा परिणाम एखाद्याला वैयक्तिक राजकीय फायदा होत असला तरी कोण कोठे गेले आणि कोण कोठे आले? यावरुन लोकांच्या जीवनावर परिणार होणार नाही, अशी टीका शरद पवार आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर केली. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटीलSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेcongressकाँग्रेस