शहरं
Join us  
Trending Stories
1
SA Won WTC Final 2025 : एडन मार्करमचे धमाकेदार शतक!! द. आफ्रिकेने रचला इतिहास; कांगारुंना हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी
2
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
3
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
4
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
5
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
6
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
7
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
8
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
9
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
10
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
11
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
12
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
13
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
14
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
15
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
16
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
17
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
18
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
19
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद

‘प्रेम’ व्हायरल करणाऱ्या प्रियकराची गळ्यात बुटाची माळ घालून काढली धिंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2021 15:22 IST

व्हिडिओही काढला ; प्रेयसीसोबतच्या आलिंगनाचे फोटोे ठेवले स्टेेटसवर

सोलापूर : प्रेयसीसोबत काढलेले अलिंगनाचे फोटो स्टेटसवर ठेवणाऱ्या प्रियकराच्या गळ्यात बुटांची माळ घालून रस्त्यावरून धिंड काढण्यात आली. यात एका तरुणीनेही पुढाकार घेत तरुणाला मारहाण केल्याचे दिसत असून, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.. दरम्यान, त्या प्रियकराच्या आईने वरील आरोपींवर ॲट्रॉसिटी व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार दिली आहे.

सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वीपासून हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील तरुण हा शहरातील एका मध्यवर्ती भागात असणाऱ्या चाळीत राहत होता. तिथेच असणाऱ्या एका मुलीसोबत त्याची मैत्री झाली. मुलगा हा सोळा वर्षाचा तर मुलगी अठरा वर्षाची होती. या अल्लड वयात दोघेही एकमेकांच्या जवळ आले. त्यादरम्यान दोघांनीही आलिंगन देत फोटो काढले. इतकंच काय तर दोघांनीही एकमेकांसोबत जगण्या-मरण्याची शपथ घेतली. दरम्यान, त्या मुलीचे लग्न नात्यातील एका मुलासोबत ठरले. त्यामुळे हे लग्न मोडावे, यासाठी त्या  तरुणाने तिच्या सोबतचे फोटो आपल्या मोबाइल स्टेटसवर ठेवले. हे फोटो व्हायरल होत मुलीच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचले. 

यामुळे संतापलेल्या कुटुंबीयांनी त्या मुलाचा शोध घेतला. मुलाच्या वाढदिवसादिवशी तुला पार्टी देतो, असे सांगत बोलावले. त्यानंतर पाच ते सहा जणांनी मिळून त्या तरुणाला मारहाण करत रस्त्यावरून धिंड काढली. दरम्यान, घराजवळ आल्यानंतर एका तरुणीनेही त्याला मारहाण केली. नंतर त्या तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. 

मुलाच्या आईची पोलिसांकडे धाव दरम्यान, मुलाच्या आईने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देत, ती सज्ञान मुलगी आपल्या मुलासोबत फोनवर बोलत होती. रात्री-अपरात्री आपल्या अल्पवयीन मुलाला स्वतःजवळ बोलून घेत त्याचे लैंगिक शोषण केले. गळ्यात पादत्राणांची माळ घालत त्याची धिंड काढली व त्याची चित्रफित समाज माध्यमावर प्रसारित केली. यामुळे त्या सर्वांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत व बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. 

आण रे बांबू !त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये त्या तरुणाला दोन जणांनी पकडून रस्त्यावरून मारहाण करत शिवीगाळ करत घेऊन जात आहेत. रस्त्यावरून जात असताना जे साहित्य हातात मिळत आहे, त्या साहित्याने त्या तरुणाला मारहाण करत असल्याचे चित्र ही व्हिडिओत दिसत आहे. यात काही तरुण आण रे तो बांबू, असे म्हणत शिवीगाळ करतानाचा आवाज येत आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टCrime Newsगुन्हेगारीSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस