मंगरुळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:43 IST2021-02-05T06:43:13+5:302021-02-05T06:43:13+5:30

प्रारंभी शाळेची घंटा वाजवून विद्यार्थ्यांची हजेरी घेण्यात आली. त्यात ३६ विद्यार्थी व ८ विद्यार्थिनी उपस्थित होते. त्यानंतर सभागृहात ...

Love gathering of alumni of Mangrule | मंगरुळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा

मंगरुळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा

प्रारंभी शाळेची घंटा वाजवून विद्यार्थ्यांची हजेरी घेण्यात आली. त्यात ३६ विद्यार्थी व ८ विद्यार्थिनी उपस्थित होते. त्यानंतर सभागृहात दिवंगत गुरुजनांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माजी शिक्षक/मुख्याध्यापक शिंदे,पाटील, बिराजदार गुरुजी, शहा, भुताळे, भास्कर,कांबळे व प्रशालेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हजर होते. सर्व माजी गुरुजनांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला त्यांची आठवण राहावी म्हणून LED TV भेट देण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या मनोगतात राजू नरुणे, धनंजय अरबळे , अल्फाज शेख, मनीष धाराशिवकर यांनी जुन्या आठवणी सांगितल्या. तसेच माजी शिक्षक बिराजदारसर, शहा मॅडम, ईचगे सर, मुख्याध्यापक पाटील, शिंदे सरांनी विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणी सांगितल्या. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक पट्टेद यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन डॉ. कीर्ती कटारे व धाराशिवकर यांनी, प्रस्तावना बोरगावकर तर आभार प्रदर्शन श्रीकांत लवटे यांनी केले.

माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा भरवण्यासाठी विलास राठोड, डॉ. कीर्ती कटारे, नरुणे, लवटे, रोहिदास, पवार, पुकाळे, कत्ते, बोरगांवकर, भासगी यांनी परिश्रम घेतले.

----३१शिरवळ

Web Title: Love gathering of alumni of Mangrule