ट्रक अपघातात साईभक्ताचा मृत्यू
By Admin | Updated: June 13, 2014 00:52 IST2014-06-13T00:52:10+5:302014-06-13T00:52:10+5:30
एका साईभक्ताचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार, १२ जून रोजी घडली़

ट्रक अपघातात साईभक्ताचा मृत्यू
सोलापूर : इनोव्हा कार आणि ट्रकची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात तेलंगणातील एका साईभक्ताचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार, १२ जून रोजी सकाळी ८़२० वाजता खानापूर पाटीजवळ घडली़
नागय्या नरसीमय्या इल्लुरु (वय ५२, रा़ इंदिराम्मा कॉलनी, रंगारेड्डी, तेलंगण) असे मरण पावलेल्या साईभक्ताचे नाव असून अपघातानंतर गंभीर जखमी होऊन तो जागीच मरण पावले़ आज सकाळी सहा वाजता इल्लुरू हे कारमधून शिर्डीकडे निघालेले असताना अपघात झाला़ उपचारासाठी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले़