शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत इनिशिएटिव्ह : घाईतला प्रवास अन् खरेदीची नाहक धांदल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 10:45 IST

सोलापूरच्या बाजारपेठेकडे पाठ : अन्य शहरांतील व्यापाºयांना सोलापूरकर ग्राहकांची मिळतेय साथ 

ठळक मुद्दे शहराच्या बाजारपेठेचे मोठे नुकसानघाईतील प्रवास अन् खरेदीची नाहक धांदल सोलापूरच्या बाजारपेठेचीही मोठी हानी

सोलापूर : आपल्या बाजारपेठेची बलस्थानं ठाऊक असताना, सोलापूरकर ग्राहक मात्र अत्यंत घाईतला आणि धोकादायक प्रवास करत पुण्या-मुंबईला आणि अन्य शहरात स्वतंत्र वाहने करून जातात अन् सांगेल त्या दराने, कमी वेळात उपलब्ध असतील तशा वस्तू माथी मारून घेऊन रातोरात सोलापुरात परततात. त्यांचा हा घाईतील प्रवास अन् खरेदीची नाहक धांदल त्यांच्या स्वत:साठी नुकसानकारक ठरत आहेच; पण यामुळे सोलापूरच्या बाजारपेठेचीही मोठी हानी होत आहे.

एकेकाळी महाराष्टÑात चौथ्या क्रमांकाचे शहर असलेल्या सोलापूरचे हे स्थान खाली गेले असले तरी येथील बाजारपेठ पहिल्यापासूनच जशी समृद्ध होती; तशीच आजही कायम आहे. व्यापाºयांनीही व्यवसायात आधुनिकता आणलेली आहे. शिक्षित, उच्चशिक्षित युवक रोजगाराची तात्पुरती संधी म्हणून व्यापारपेठांतील दुकानांमध्ये सेल्समन म्हणून काम करत आहेत. त्यांच्याकडून ग्राहकांना तत्परतेने सेवा मिळत आहे, हा अनुभव अनेकांनी अनेकवेळा घेतलेलाही आहे. व्यापाºयांमध्ये व्यवसायाची निकोप स्पर्धा असल्यामुळे ग्राहकांना दर्जेदार वस्तू मिळत असल्याचेही निदर्शनास येते; पण असंख्य सोलापूरकर ग्राहकांना बाहेरच्या शहरात जाऊन खरेदी करण्याचा मोह काही आवरत नाही.

सोलापुरात साड्यांची स्वतंत्र दालने आहेत. सर्व प्रकारच्या साड्या येथे स्पर्धात्मक दरात उपलब्ध आहेत. सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी तर आपला सराफ कट्टा प्रसिद्धच आहे. शिवाय पुण्या-मुंबईची काही ब्रँडेड दालनंही सोलापुरात थाटलेली आहेत.  तरीही दागिने खरेदी बाहेर जाऊन केली जाते, याबद्दल व्यापाºयांनीही आश्चर्य व्यक्त केलेले आहे. चादर-टॉवेलच्या उत्पादन आणि विक्रीचे सोलापूर हे देशातील प्रसिद्ध हब आहे; पण टर्किश टॉवेल्सचे जंबो पॅक  टीव्हीवरील ‘शो’ पाहून आॅनलाईन मागविण्याचा ग्राहकांंचा कलही दिसून येतो.सोलापुरात ग्राहकांची ही मानसिकता आहेच; पण जिल्ह्यातील पंढरपूर,माळशिरस, सांगोला आदी तालुक्यातील ग्राहकही पुणे, कोल्हापुरात खरेदीसाठी जातात, हे कधी ऐकून, पाहून निदर्शनास येते. लग्न सराईमध्ये किंवा कुटुंबामध्ये एखादा मोठा समारंभ असेल तर सोलापूरकर ग्राहक स्वत:ची किंवा प्रसंगी भाड्याने वाहन घेऊन पुण्या-मुंबईला खरेदी करायला जातात.

हे सारेच मोठं खर्चिक असतं. सहकुटुंब खरेदीला जाण्यासाठी इनोव्हा किंवा तवेरासारख्या मोठ्या गाड्या भाड्याने घ्याव्या लागतात. यासाठी अनुक्रमे १३ रुपये, ११ रुपये प्रतिकिलोमीटर दर आहे. सकाळी प्रवासाला निघाल्यानंतर दुपारपर्यंत पुण्यात आणि सायंकाळी मुंबईत वाहन पोहोचंत. त्यानंतर घाईघाईत खरेदी केली जाते. मुक्काम करणे परवडणारे नसल्यामुळे रातोरात ग्राहक सोलापूरकडे निघतात....हा साराच प्रवास धोकादायक असतो...प्रस्तुत प्रतिनिधीने अशा प्रवासी ग्राहकांच्या दौºयाचे आणि धांदलीचे अनेक किस्से ऐकलेले आहेत.

सोलापूरकर ग्राहकांच्या या मानसिकतेमुळे या शहराच्या बाजारपेठेचे मात्र मोठे नुकसान होत आहे. शहरातील अनेक बाजारपेठा ऐन हंगामात ओस पडताना दिसून येत आहेत, ग्राहकांची ही मानसिकता बदलण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. यासाठी व्यापारी संघटनांनी पुढाकार घ्यावा आणि सोलापुरातील पैसा सोलापुरातच खर्ची व्हावा, अशी अपेक्षा अनेक व्यापाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

हो, खरेदीसाठी प्रवासाला निघतात!- सोलापुरातील ग्राहक खरेदीसाठी मोठ्या संख्येने प्रवासाला निघतात, हा माझाही अनुभव असल्याचे ट्रॅव्हल एजंट दत्ता शिंदे यांनी सांगितले. ते म्हणाले की, आमच्याकडे गाड्यांचे बुकिंग होते. प्रवासाचा दिवस ठरतो. भाडे ठरते; पण प्रवास कशासाठी करत आहेत, याची कल्पना आम्हाला नसते; पण पुण्या-मुंबईत गेल्यानंतर गाडी जेव्हा एखाद्या कपडे, सोन्या-चांदीच्या दालनासमोर उभी करायला सांगितली जाते तेव्हाच प्रवासाला आलेले ग्राहक खास गाडी भाड्याने घेऊन प्रवासाला आल्याचे आम्हाला समजते, असे शिंदे म्हणाले.

टॅग्स :SolapurसोलापूरMarketबाजारPuneपुणेmarriageलग्न