शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत इनिशिएटिव्ह ; ‘कचराफेकूं’ विरोधात मोहीम आक्रमक; एकाच दिवसात दोनशे व्यापाºयांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 12:00 IST

आरोग्य विभाग : महिलांच्या तक्रारींनंतर महापालिकेचा कारवाईचा धडाका

ठळक मुद्दे गोरगरीब महिलांनी घंटागाडीत कचरा टाकण्याची सवय लावून घेतलीघंटागाडी येऊनही शहराच्या विविध भागातील दुकानदार, नागरिक, संस्था रस्त्यावर कचरा टाकत आहेत बेशिस्त लोकांची पोलखोल करण्याचे काम शहरातील स्मार्ट महिलांनी लोकमतच्या माध्यमातून सुरू

सोलापूर : शहरातील रस्त्यांवर कचरा टाकणारे बेशिस्त दुकानदार, नागरिक अशा २५० हून अधिक जणांवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने सोमवारी रात्री दंडात्मक कारवाई केली. गोरगरीब महिलांनी घंटागाडीत कचरा टाकण्याची सवय लावून घेतली आहे. तुम्हीसुध्दा ही सवय लावून घ्या. आपलं सोलापूर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची जबाबदारी घ्या, असे आरोग्य निरीक्षकांनी या दुकानदार आणि नागरिकांना सुनावल्याचे सांगण्यात आले. 

घंटागाडी येऊनही शहराच्या विविध भागातील दुकानदार, नागरिक, संस्था रस्त्यावर कचरा टाकत आहेत. या बेशिस्त लोकांची पोलखोल करण्याचे काम शहरातील स्मार्ट महिलांनी लोकमतच्या माध्यमातून सुरू केले आहे. या महिलांनी दिलेली माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे देण्यात आली आहे. मनपा आरोग्य विभागाकडून नियमित कारवाई केलीच जाते. परंतु, लोकमतच्या मोहिमेनंतर आरोग्य विभागाने सोमवारपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. महापालिका उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी आरोग्य निरीक्षकांची बैठक घेतली.

शहराच्या विविध भागात रात्री जाऊन दुकानाबाहेर पडलेल्या कचºयाचे फोटो काढा, दुकान उघडे असेल तर त्याच ठिकाणी त्यांना दंड करा, दुकान     बंद असेल तर दुसºया दिवशी सकाळी जाऊन दंड आकारणी करा, असे आदेश दिले. त्यानुसार नवी पेठ, शिवाजी चौक, चाटी गल्ली, सात रस्ता या भागातील चायनीज गाडीवाले, हॉटेल्स, पानपट्टी चालक यांना दीडशे ते अडीचशे रुपयांप्रमाणे दंड आकारण्यात आला. जे दुकानदार दंड भरण्यास नकार देत आहेत त्यांच्याविरुध्द पोलिसांत तक्रार करण्यात येत असल्याचे आरोग्य निरीक्षकांकडून सांगण्यात आले. ही मोहीम कायम राहणार असल्याचेही ढेंगळे-पाटील यांनी सांगितले. 

प्रभाग ९ मध्ये काढणार जनजागृती फेरी - नागरिकांनी आपला कचरा नियमितपणे घंटागाडीतच टाकावा, स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर या मोहिमेत सहभाग नोंदवावा यासाठी जुळे सोलापूर भागातील नगरसेविका जनजागृती फेरी काढणार आहेत. त्याप्रमाणे पूर्व भाग, होटगी रोड परिसर या भागातही जनजागृती फेरी काढण्यात येईल, असे नगरसेवक नागेश वल्याळ आणि संतोष भोसले यांनी जाहीर केले. ज्या भागात घंटागाड्या येत नाहीत त्या भागातील नागरिकांनी आमच्याशी संपर्क करावा. प्रशासनाशी समन्वय साधून आम्ही नियमितपणे घंटागाड्यांचे नियोजन करु. पण रस्त्यावर कचरा टाकू देणार नाही. आमचा प्रभाग घाण करु देणार नाही, असे वल्याळ आणि भोसले यांनी सांगितले. 

कारवाईच्या भीतीने शिमलानगरात जाळला कचरा- विजापूर रोड भागातील काही नागरिक रस्त्यावर कचरा टाकत आहेत. गुलमोहर अपार्टमेंटजवळ कचºयाचे ढीग झाले होते. रस्त्यावर कचरा टाकणाºयांची नावे या भागातील स्मार्ट महिलांनी महापालिकेला कळविली आहेत. कारवाईच्या भीतीमुळे सोमवारी हा कचरा जाळून टाकल्याचे पाहायला मिळाले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSmart Cityस्मार्ट सिटीenvironmentवातावरण