शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

Lok Sabha Election 2019; २३१९ शस्त्रे जमा करा; सोलापूर शहर पोलिसांनी धाडल्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 13:21 IST

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात येत्या १८ आणि २३ तारखेला सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर ...

ठळक मुद्देशहरात ५१२ पैकी ४४२ जणांना निर्देश, १०० शस्त्रे जमाविजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीत सर्वाधिक परवानाधारक

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यात येत्या १८ आणि २३ तारखेला सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर शहर आणि जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांनी निवडणूक प्रक्रिया पार पडेपर्यंत आपली शस्त्रे जमा करावीत, अशा नोटिसा पोलीस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलीस प्रशासनाने संबंधितांना बजावल्या आहेत. शहरात ५१२ आणि जिल्ह्यात ३ हजार ९३९ असे एकूण ४५५१ परवानाधारक आहेत. यात जिल्ह्यातून १८७७ आणि शहरातून ५४२ जणांना शस्त्रे जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

निवडणूक प्रक्रिया निर्भयपणे पार पडावी. शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी या अनुषंगाने ही कार्यवाही करण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी स्पष्ट केले. सोलापूर जिल्ह्यात उद्योजक, व्यावसायिक, विविध कंपन्या, बँकांमध्ये काम करणारे सुरक्षारक्षक अशा विविध घटकांमधील नागरिकांनी सबळ कारणे स्पष्ट करून सुरक्षेच्या दृष्टीने रितसर शस्त्र बाळगण्याचे परवाने घेतले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राबवण्यात आलेल्या या कार्यवाहीतून बँका, कंपन्यांमध्ये सुरक्षेची कामे करणाºया ७० जणांना यातून वगळण्यात आले आहे. यामुळे शहरातल्या ४४२ जणांना शस्त्रे पोलीस आयुक्तालयामध्ये जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित परवानाधारकांना ११ मार्च रोजी नोटिसीद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. १८ मार्चपर्यंत यासाठी मुदत देण्यात आली आहे. या सूचनेनुसार परवानाधारकांकडून प्रतिसाद मिळू लागला आहे. 

विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीत सर्वाधिक परवानाधारकच्सोलापूर शहरात सात पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत ५७२ शस्त्र परवानाधारकांपैकी विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत १३१ म्हणजे सर्वाधिक परवानेधारक आहेत. त्या खालोखाल फौजदार चावडी हद्दीमध्ये ११९, सदर बझार- ९३, जोडभावी- ५४, जेलरोड- ३१, सलगर वस्ती- ३० आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३० जणांचा समावेश आहे. 

असे आहेत शस्त्राचे प्रकार 

  • - १२ बोअर, रिव्हॉल्व्हर आणि पिस्टल अशा तीन प्रकारच्या शस्त्रांना सुरक्षेच्या कारणावरून पोलीस आयुक्तालयाकडून परवाने देण्यात आले आहेत. स्वत:ची अथवा आपल्या फर्मच्या सुरक्षेसाठी असे परवाने देण्यात येत असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

निवडणूक प्रक्रिया निर्भयपणे पार पडली जावी, यासाठी परवानाधारकांकडून शस्त्रे जमा करण्याचे काम सुरू आहे. दोन्ही लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी पार पडेपर्यंत ही शस्त्रे पोलीस प्रशासनाच्या ताब्यात असतील. हा दैनंदिन कामाचा एक भाग आहे. निवडणूक काळात शांतता व सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन सज्ज आहे. जनतेनेही यामध्ये सक्रिय योगदान द्यावे.- महादेव तांबडे, पोलीस आयुक्त

अन्यथा कारवाई- पोलीस आयुक्त

  • - शस्त्रे जमा करण्याच्या सूचना देऊनही ती जमा केली नाहीत तर संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. परवानाधारकांनी दिलेल्या मुदतीत ती जमा करावीत, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी स्पष्टोक्ती पोलीस आयुक्त तांबडे यांनी दिली. 
टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक