शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

कर्जमाफी, सोलापूर जिल्ह्यातील १५ बँकांच्या ३२७ शाखांतून १४ हजार ८७१ शेतकºयांच्या खात्यावर जमा केले ११३ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 13:14 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची १५ राष्टÑीयीकृत बँकांनी १४ हजार ८७१ शेतकºयांच्या बँक खात्यावर ११३ कोटी ३१ लाख ३४ हजार २२७ रुपये इतकी रक्कम जमा केली आहे.

ठळक मुद्देराज्य शासनाने दिलेल्या कर्जमाफीत सर्वाधिक शेतकरी सोलापूर जिल्हा बँकेचेजिल्ह्यात विविध प्रकारच्या ३१ बँकाजिल्हा मध्यवर्ती बँकेला आतापर्यंत २७५ कोटी

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १६ : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची १५ राष्टÑीयीकृत बँकांनी १४ हजार ८७१ शेतकºयांच्या बँक खात्यावर ११३ कोटी ३१ लाख ३४ हजार २२७ रुपये इतकी रक्कम जमा केली आहे.राज्य शासनाने दिलेल्या कर्जमाफीत सर्वाधिक शेतकरी जिल्हा बँकेचे असून, राष्टÑीयीकृत बँकांची रक्कम सध्यातरी कमीच दिसते. जिल्ह्यातील एकूण ३० राष्टÑीयीकृत बँकांपैकी १५ बँकांची सुरुवातीची माहिती मिळाली असून, त्यानुसार १४ हजार ८७१ शेतकºयांच्या बँक खात्यावर ११३ कोटी ३१ लाख ३४ हजार २२७ रुपये जमा झाले आहेत.  विदर्भ कोकण बँकेच्या  ५ हजार ७६२ शेतकºयांच्या खात्यावर ४३ कोटी ७२ लाख ९ हजार ४९८ रुपये जमा केले आहेत. या बँकेच्या जिल्हाभरात ३५ शाखा आहेत. स्टेट बँक आॅफ इंडियाने २३६८ शेतकºयांच्या खात्यावर १८ कोटी ४१ लाख ६० हजार रुपये, बँक आॅफ इंडियाने २६१६ शेतकºयांची २३ कोटी ८० लाख ८१ हजार २५९ रुपये,  बँक आॅफ महाराष्टÑने १६८६ शेतकºयांची १४ कोटी ६८ लाख ४८ हजार, युनियन बँक आॅफ इंडियाने ५ कोटी ५९ लाख ११ हजार ७६ रुपये, सेंट्रल बँक आॅफ इंडियाने ४४५ शेतकºयांची ३ कोटी ८६ लाख, आय.सी.आय. सी.आय. बँकेने ५२१ शेतकºयांची एक कोटी ३१ लाख ४३ हजार ७३० रुपये इतकी रक्कम जमा केली आहे.बँक आॅफ बडोदाने १६७ शेतकºयांचे ७५ लाख ९८ हजार ५९० रुपये, आंध्र बँकेने चार शेतकºयांच्या खात्यावर दोन लाख ७५ हजार ६७ रुपये, ओरिएंटल बँकेने चार शेतकºयांचे दोन लाख पाच हजार ७४९ रुपये, सिंडीकेट बँकेने ३५ शेतकºयांच्या खात्यावर ३० लाख २४ हजार ६३० रुपये, युको बँकेच्या ७४ शेतकºयांचे  ६९ लाख ७० हजार ३२० रुपये, विजय बँकेने ८ शेतकºयांचे दोन लाख ६४ हजार ९८२ रुपये, फेडरल बँकेने १६ शेतकºयांचे ७ लाख ३८ हजार ७५९ रुपये, कर्नाटका बँकेने दोन शेतकºयांचे एक लाख दोन हजार ५६७ रुपये जमा केले आहेत. -------------------एकूण झाले ३८८ कोटीछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योेजनेच्या कर्जमाफी झालेल्या जिल्ह्यात विविध प्रकारच्या ३१ बँका असून, त्यापैकी जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. याशिवाय अन्य ३० पैकी १५ बँकांची माहिती आली असून, उर्वरित १५ बँकांची अद्याप माहिती आली नसल्याचे जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी सांगितले.  जिल्हा मध्यवर्ती बँकेला आतापर्यंत २७५ कोटी तर राष्टÑीयीकृत बँकांना ११३ कोटी असे एकूण ३८८ कोटी रुपये जिल्ह्यातील शेतकºयांना आले आहेत. 

टॅग्स :Solapurसोलापूरbankबँक