शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

थेट लढत झाल्याने मतदानाची चुरस वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 15:35 IST

माढा विधानसभा मतदारसंघ; एकास एक सरळ लढत झाल्याने मतदारसंघ ढवळून निघाला

ठळक मुद्देयंदा मतदानाची टक्केवारी घसरली असून, ती ६९.०७ टक्के एवढीच झाली मतदारांची संख्या मात्र २ लाख  ९६ हजार २१३ वरून ३ लाख २६ हजार ७७८  एवढी झालीएकास एक सरळ लढत होऊनही मतदानाची टक्केवारी वाढण्यापेक्षा ती कमी झाली

डी. एस.  गायकवाड

टेंभुर्णी: माढाविधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे व शिवसेनेचे संजय कोकाटे यांच्यात एकास एक सरळ लढत झाल्याने प्रथमच हा मतदारसंघ ढवळून निघाला असून, ही निवडणूक लोकांच्या चर्चेचा विषय बनला आहे.

२०१४ ची विधानसभानिवडणूक बहुरंगी झाली होती. त्यावेळी राष्ट्रवादीचे बबनराव शिंदे, काँग्रेसचे कल्याणराव काळे व शिवसेनेचे शिवाजी सावंत यांच्यात सामना रंगला होता. या निवडणुकीत २ लाख ९६ हजार २१३ मतदारांपैकी २ लाख २२ हजार ९८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून ७५.२८ टक्के एवढे विक्रमी मतदान केले होते.  

या निवडणुकीमध्ये आमदार बबनराव शिंदे ९७, ८०३ मते  घेऊन विजयी झाले होते . यंदा मतदानाची टक्केवारी घसरली असून, ती ६९.०७ टक्के एवढीच झाली आहे. मतदारांची संख्या मात्र २ लाख  ९६ हजार २१३ वरून ३ लाख २६ हजार ७७८  एवढी झाली आहे .एकास एक सरळ लढत होऊनही मतदानाची टक्केवारी वाढण्यापेक्षा ती कमी झाली आहे. याचा फटका कोणास बसणार याची लोक चर्चा करीत आहेत.

माढा विधानसभा मतदारसंघातील १३४ गावांपैकी माढा तालुक्यातील मिटकलवाडी येथे सर्वात जास्त ८६ टक्के  एवढे तर माळशिरस तालुक्यातील महाळुंग गट क्रमांक २ येथे ३६ टक्के एवढे सर्वात कमी मतदान  झाले. मतदारसंघातील सुमारे ८० गावात ८० टक्के मतदान झाले  आहे. यामध्ये माढा तालुक्यातील गावांची संख्या जास्त आहे. 

का घट झाली?- मतदानाच्या दिवशी संपूर्ण माढा मतदारसंघात पहाटेपासूनच पाऊस चालू होता. त्यामुळे सर्वच मतदान केंद्रांसमोरील जागेत विशेषकरून ग्रामीण भागात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. वाड्यावस्त्यांवरून येणाºया मतदारांना रस्त्यावरील चिखल तुडवत मतदान केंद्र गाठावे लागत होते. मतदान केंद्रावर दुपारनंतर एकदमच वाढलेले मतदार व लांबच लांब लागलेल्या मतदारांच्या रांगा यामुळे मतदानास विलंब लागत होता. यामुळे काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मतदान चालू होते तर काहींनी पाऊस व चिखल यामुळे घरात बसणेच पसंत केले होते. यामुळेही काही ठिकाणची  मतदान टक्केवारी घटल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरmadha-acमाढाvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण