विजेचा लोळ अंगावर पडला पण धोका टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:27 IST2021-07-07T04:27:53+5:302021-07-07T04:27:53+5:30

विजेचा लोळ संगीता झिंजाडे यांच्या अंगावर पडल्याने घरात जोरदार रडारड सुरू झाली. त्यानंतर किसन आबा झिंजाडे यांनी बेशुद्ध संगीताच्या ...

Lightning struck but the danger was averted | विजेचा लोळ अंगावर पडला पण धोका टळला

विजेचा लोळ अंगावर पडला पण धोका टळला

विजेचा लोळ संगीता झिंजाडे यांच्या अंगावर पडल्याने घरात जोरदार रडारड सुरू झाली. त्यानंतर किसन आबा झिंजाडे यांनी बेशुद्ध संगीताच्या चेहऱ्यावर पाणी मारले आणि थोडी हालचाल जाणवल्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल केले. दवाखान्यातील उपचार सुरू झाल्यानंतर अडीच तासाने संगीता झिंजाडे शुद्धीवर आल्या आणि त्यांच्या जिवाचा धोका टळला.

----

नशीब बलवत्तर.. धोका टळला

रात्री पाऊस पडत होता. संगीता या पाण्याची घागर बाहेरून घरात घेऊन येत असताना विजेचा लोळ आला. सुदैवाने हा लोळ बाजूला गेला, पण संगीता यांना त्याची झळ पोहोचली व त्या जागीच बेशुद्ध पडल्या. काही वेळाने चेहऱ्यावर पाणी मारल्यावर थोडी हालचाल जाणवली आणि त्यांना दवाखान्यात दाखल केले. त्यामुळे धोका टळला असल्याचे किसन (आबा) झिंजाडे यांनी सांगितले.

----

---

Web Title: Lightning struck but the danger was averted