जिल्हाधिकाऱ्यांच्या 'त्या' चिठ्ठीवर सुरू आहे फिरवाफिरवी; जिल्हा परिषदेचे एकमेकांकडे बोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 01:06 PM2020-06-22T13:06:12+5:302020-06-22T13:08:29+5:30

बोरामणीच्या आरोग्य अधिकाऱ्याची होतेय पाठराखण; झेडपी सीईओ म्हणाले अहवाल आल्यावर बघू...

The 'that' letter from the Collector is being circulated; Zilla Parishad's boats to each other | जिल्हाधिकाऱ्यांच्या 'त्या' चिठ्ठीवर सुरू आहे फिरवाफिरवी; जिल्हा परिषदेचे एकमेकांकडे बोट

जिल्हाधिकाऱ्यांच्या 'त्या' चिठ्ठीवर सुरू आहे फिरवाफिरवी; जिल्हा परिषदेचे एकमेकांकडे बोट

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषदेमधील अधिकाऱ्यांना नाही गांभीर्यजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही जिल्हा परिषदेमधील अधिकारी गप्पच

सोलापूर: कोरोना पॉझीटीव्ह अहवाल आल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्णालयात उपचार घेणाºया नर्सने व्हाटसपवर पाठविलेल्या चिठ्ठीची दखल जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी घेत संबंधीतांना तिची काळजी घेण्याची सूचना केली व या प्रकरणात हाय करणाऱ्या बोरामणी आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकार्‍यावर कारवाई करण्याबाबत शिफारस केली असल्याचे सांगितले होते, पण इकडे जिल्हा परिषदेत मात्र याबाबत एकमेकांकडे बोट करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे.

बोरामणी प्राथिमक आरोग्य केंद्रातील नर्स तुळजापूर रुग्णालयात उपचारास दाखल झाल्यावर तिचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. रुग्णालयात अ‍ॅडमिट असतानाच तिने जिल्हाधिकाºयांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकाºयांच्या सूचनेनुसार तिने एका कागदावर घडलेला प्रकार लिहून व्हॉटसपवर पाठविला. जिल्हाधिकाºयांनी व्हाटसपवर तिने पाठविलेली चिठ्ठी वाचली.  आरोग्य केंद्रातील कर्मचाºयांना सुरक्षा साहित्य वेळेवर पुरविले गेले नाही. साहित्य नसल्याचे आपल्याला बाधा झाल्याचे नमूद केले आहे.
आरोग्य कर्मचाºयांना दोन महिन्यापासून पगार नाही. त्रास होत असल्याबाबत आरोग्य अधिकारी कल्पना देऊनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले असे तिने चिठ्ठीत नमूद केले आहे. माझ्या सर्व कुटुंबियास क्वारंटाईन केले आहे. माझ्याकडे औषधाला पैसे नाहीत, उपचाराची व्यवस्था व्हावी अशी विनंती केल्यावर जिल्हाधिकार्यानी तिच्या उपचाराची व्यवस्था केली. व्हाटसपवर आलेली ही चिठ्ठी पुढील कारवाईसाठी जिल्हा परिषदेचे सीईओ यांच्याकडे पाठविणार असल्याचे सांगितले होते.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी संबंधित नर्स आपल्या गावी गेल्यावर बाधीत झाली आहे. याला आरोग्य अअधिकाऱ्यांनाकसे जबाबदार धरता येईल असे सांगून त्यांची पाठराखण केली आहे तर सीईओ प्रकाश वायचळ यांनी आरोग्य अधिकाऱ्यांचा याबाबत अहवाल आल्यानंतर बघू असे सांगितले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या त्या चिठ्ठीचे कोणालाच गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.

Web Title: The 'that' letter from the Collector is being circulated; Zilla Parishad's boats to each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.