शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मोबाईलचे चिनी अ‍ॅप अनइन्स्टॉल करू; स्वदेशीच्या वापराने शत्रूचा बीमोड करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 18:39 IST

तरूणाईचेही ‘बायकॉट चायना’ : विश्वासघात करणाºया दुश्मनाला आत्मनिर्भर होऊनच धडा शिकवू

सोलापूर : एक काळ मैत्री होती, आता नाही़ अनेक प्रकारे केलेली गुंतवणूक ही कमी करण्यासाठी प्रयत्न करू...स्वदेशीबाबत जनजागृती करू... टिकटॉकसारखे चिनी अ‍ॅप बंद करू. आत्मनिर्भर होऊन लढू़.. चीनला धडा शिकवू़.. विश्वासघात करणाºया दुश्मनाला धडा शिकवू, अशी संतप्त प्रतिक्रिया सोलापुरातील तरूणाईमधून गुरूवारी व्यक्त झाली.

भारतीय सीमेवर गलवान खोºयात झालेल्या हल्ल्यात भारतीय सैन्यातील २० जवान शहीद झाल्यानंतर भारतातून चीनविरोधात संतापाची लाट उसळली आहे़ तरूणाईसह प्रत्येकाच्याच मोबाईलवर टिकटॉक, यूसी ब्राऊजरसह विविध अ‍ॅप्स् डाऊनलोड केलेले असतात. हे सर्व अ‍ॅप्स् बंद करण्यात येतील, असेही युवकांनी सांगितले.

चीनी अ‍ॅप बंद करण्याबरोबरच घरात लागणाºया दररोजच्या वस्तू या भारतीय बनावटीच्याच येतील, याची आम्ही काळजी घेणार आहोत, असेही युवक, युवतींनी सांगितले.

चीनने भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला संताप यावा, असे कृत्य केले आहे़ कोरोनामुळे चीनचे नाव खराब झाले आहे़ याच काळात भारतावर हल्ला करून चीनने जगभराचा रोष ओढवला आहे़  चीनच्या वस्तू खरेदी करणार नाही़ मोबाईलमधील अ‍ॅप अनइन्स्टॉल करतोय.- मयूर गिरे, विद्यार्थी, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर

लोकमान्य टिळकांची आज आठवण होतेय़ त्यांनी त्याचवेळी स्वदेशीचा नारा दिला होता़ सर्वसामान्यांनी उलट चायना वस्तू वापरून त्यांची निर्यात वाढवली आणि भारतातील निर्यात घटवली़  हीच वेळ आहे स्वयंभू होण्याची़ त्यामुळे आम्ही यापुढे स्वदेशीचा पुरस्कार करू तो इतरांमध्ये रूजवू.- प्रांजल कोळी, विद्यार्थिनी

चिनी वस्तू वापरू नका, असे सोशल मीडियावर सुरू झालेल्या कॅम्पेनला माझा पाठिंबा आहे़  विदेशी वस्तूपेक्षा भारतीय वस्तू खरेदी करण्यासाठी यापुढे पुढाकार असणार आहे़  सोशल मीडियावर लवकरच कॅम्पेन सुरू करणार आहे़ स्वदेशीचा स्वीकार करून भारतीय अर्थव्यवस्था बळकट करू.- फैय्याज शेख, विद्यार्थी, माऊली महाविद्यालय, वडाळा

भारतीय अर्थव्यवस्थेबाबत जनजागृती करण्याची संधी आम्हा युवतींना मिळाली आहे़ समाजकार्याचे धडे घेणाºया विद्यार्थ्यांमध्ये चीनचा लपलेला खरा चेहरा पुढे आणू़ भारतातील विविध स्टार्टअपमध्ये चिनी गुंतवणूक झाली आहे़ यातून चीन भारतातून पैसा ओढत आहे़ - मेघा लंबे, युवती 

लडाखमध्ये चिनी सैन्याशी भारतीय सैन्य लढत आहे़ भारतीय सैन्याचे मनोबल वाढवण्याच्या संकल्पना रुजवण्याचा प्रयत्न क रणार आहे़ गलवान खोºयात चीनच्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाले़ लढणाºया सैन्याला औषधे, आर्थिक बळ देण्यासाठी समाजात जनजागृती करू़ - दर्शना माळी, युवती

टॅग्स :SolapurसोलापूरchinaचीनEducationशिक्षणMarketबाजार