डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी सुरु असलेली वणवण थांबवू या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:23 IST2021-09-19T04:23:31+5:302021-09-19T04:23:31+5:30
भांबुर्डी (ता. माळशिरस) येथील ग्रामीण पेयजल योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उत्तमराव जानकर, तालुकाध्यक्ष माणिकराव वाघमोडे, तुकाराम ...

डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी सुरु असलेली वणवण थांबवू या
भांबुर्डी (ता. माळशिरस) येथील ग्रामीण पेयजल योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उत्तमराव जानकर, तालुकाध्यक्ष माणिकराव वाघमोडे, तुकाराम देशमुख, मारुती पाटील, युवक अध्यक्ष बाबासाहेब माने, सरपंच स्वाती वाघमोडे, गणपतराव वाघमोडे आदी उपस्थित होते. ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत भांबुर्डी गावची पेयजल योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. गावागावांत अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या योजना राबविणे आवश्यक आहे. ‘हर घर जल’ ही योजना राबविण्यासाठी गावांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
यावेळी ॲड. सोमनाथ वाघमोडे यांनी गावातील विकासकामांचा आलेख सर्वांसमोर मांडला. यावेळी ॲड. संदीप वाघमोडे, अन्नभेसळ अधिकारी गोविंद वाघमोडे, राष्ट्रवादीचे प्रसिद्धीप्रमुख हनुमंत शेंडगे यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी उपसभापती प्रताप पाटील, अर्जुनसिंह मोहिते-पाटील, दादासाहेब वाघमोडे, पं. स. सदस्य अजय सकट, किशोर सूळ, कीर्ती पालवे, शिवाजी शिंदे, अजय पाटील आदी उपस्थित होते.