शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

चला... मोदींच्या सोलापुरी जॅकेटचा आपणच शोध घेऊ या ! सुशीलकुमार शिंदे यांचे खोचक आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 11:57 IST

निवडणुकीत शब्द दिल्याप्रमाणे अगोदर पोलीस दलासाठी कापड घ्या...

ठळक मुद्देसुशीलकुमार शिंदे यांनी मंगळवारी सायंकाळी येथील ‘लोकमत भवन’ला भेटनिवडणुका जिंकून घ्यायच्या म्हणून सोलापूर येथील प्रचाराच्या भाषणात ठोकून दिलं - शिंदे

सोलापूर : निवडणुका जिंकायच्या म्हणून काहीही ठोकून द्यायचं ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची खासियत. आता परवा शिर्डीच्या दौºयात त्यांनी सोलापुरातून हातमागावर विणलेले जॅकेट मिळत असल्याचा उल्लेख केला. हे ऐकून आम्ही सारेच अवाक् झालो. असे जॅकेट इथं कुठं मिळते, असा सवाल सारेच एकमेकांना करू लागले आहेत. म्हणूनच सोलापूरकरांनी आता या जॅकेटच्या दुकानाचा शोध घ्यायला हवा, असे खोचक आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. 

सुशीलकुमार शिंदे यांनी मंगळवारी सायंकाळी येथील ‘लोकमत भवन’ला भेट दिली. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, २०१४ च्या निवडणुकीत पंतप्रधान मोदींना हातमाग आणि हॅँडलूममधील फरक कळला नाही. 

निवडणुका जिंकून घ्यायच्या म्हणून सोलापूर येथील प्रचाराच्या भाषणात ठोकून दिलं त्यांनी. लोकांनी विश्वासानं त्यांना निवडून दिलं. पण आपण सगळ्यांनी त्यांच्याकडून याचं उत्तर घेतलंय का? सोलापुरातून किती कापड पोलीस दलाला देण्यात आलं. देशाचा पंतप्रधान एका सहीनिशी हवे तेवढं कापड घेऊ शकतो. सोलापूरसाठी त्यांनी एवढं काम केलं असतं तर आनंद वाटला असता. आता शिर्डीच्या दौºयात त्यांनी सोलापुरातून हातमागावर विणलेलं जॅकेट मिळत असल्याचा उल्लेख केला. आपण सर्वांनी या जॅकेटच्या दुकानाचा शोध घ्यायला हवा, असेही शिंदे शेवटी म्हणाले.

सोलापुरात हातमागावर जॅकेट तयार होत नाहीत. परंतु, मी २०१२ मध्ये त्यांना त्यांचे चित्र असलेले वॉल हँगिंग दिले होते. त्या वेळेस त्यांनी मी आणलेले वॉल हँगिंग उघडून दाखवावे, असा आग्रह केला. शिर्डीमध्ये त्यांना कदाचित वॉल हँगिंग म्हणायचे असेल. - श्रीनिवास दायमा, कोषाध्यक्ष, शहर भाजपा

मोदी नेमके काय म्हणाले मला माहीत नाही. त्यांना कुणी जॅकेट दिले असेल याची माहिती नाही. मला हा प्रश्न विचारून कशाला अडचणीत आणताय ?- अशोक निंबर्गी,  शहराध्यक्ष, भाजपा

टॅग्स :SolapurसोलापूरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा