शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडचा एन्काऊंटर करण्याची ऑफर; निलंबित पोलीस अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा
2
नववर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी: ९ राशींवर पंचग्रही योगाचा लाभ; सुवर्ण संधी, बाप्पा शुभ करेल!
3
"काँग्रेसनं मुस्लीम अध्यक्ष का बनवला नाही? बाबासाहेब जिवंत होते तोवर..."; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
4
हिरे व्यापारी ते फरार, कोट्यवधींची संपत्ती जप्त; आता किती आहे PNB घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीची संपत्ती
5
वक्फ बिल योग्य असते तर मुस्लिम आज पंक्चर काढत बसला नसता; मोदींचे पहिल्यांदाच वक्फ कायद्यावर वक्तव्य...
6
शेतकऱ्याचा मुलगा बनला ED अधिकारी, गावात पहिलीच सरकारी नोकरी; जाणून घ्या यशोगाथा
7
Video - खळबळजनक! घरात घुसून शहीद जवानाच्या पत्नीला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण
8
Alphonso Mangoes: कोकण हापूसच्या नावाखाली कर्नाटक, ‘आंध्र’च्या आंब्याची विक्री
9
धक्कादायक! जेवण मागितलं म्हणून बायकोनं नवऱ्याला टेरेसवरून खाली ढकललं
10
मोठा निर्णय! पाणीटंचाईमुळे खासगी टँकर्स, विहिरी, बोअरवेल मुंबई महापालिका ताब्यात घेणार
11
खळबळ उडाली! हवाई दलाच्या विमानावर हवेत असतानाच मोठा हल्ला; म्यानमारला मदत नेत असताना...
12
Health Tips: 'हे' दहा आयुर्वेदिक उपाय देतील निरोगी शरीर आणि संतुलित वजन; आजपासून करा सुरुवात!
13
IPL: पहिल्या पराभवाचे दु:ख, त्यातच मोठा धक्का! Mumbai Indians शी हरल्यानंतर अक्षरवर मोठी कारवाई
14
रॅपिडोची स्टोरी माहितीय का? ७५ वेळा आयडिया नाकारली; आज कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय
15
देवेंद्र विरुद्ध फुले, आंबेडकर अशा प्रकारचा वाद त्यांच्या मनात; पाटलांचे राऊतांना प्रत्युत्तर
16
Murshidabad Violence : “हल्लेखोर आले, पोलिसांना फोन केला पण...”; मुर्शिदाबाद हिंसाचारातील थरकाप उडवणाऱ्या घटना
17
चीनच्या एका निर्णयाने अमेरिकाच नाही तर पाश्चिमात्य देशही चिंतेत; ट्रम्प यांच्याकडे कोणता पर्याय?
18
मुंबईत काँग्रेसचे पाच नगरसेवक तरी निवडून येतील का?
19
संतापजनक! साड्या वाटपासाठी बोलावलं, रागाच्या भरात आमदाराने महिलेच्या डोक्यावर मारलं अन्...
20
मेघना गुलजारच्या सिनेमात करीना कपूरची वर्णी, 'या' सुपरस्टारसोबत स्क्रीन शेअर करणार

‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 12:15 IST

संत तुकाराम महाराजांच्या सुंदर वचनाप्रमाणे गरजूंना आपणाकडून जे जे शक्य होईल ती ती मदत आपण केली पाहिजे.

‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या संत तुकाराम महाराजांच्या सुंदर वचनाप्रमाणे गरजूंना आपणाकडून जे जे शक्य होईल ती ती मदत आपण केली पाहिजे. मात्र मदत करताना आर्थिक हितसंबंध येता कामा नये, याची काळजी आपण घेतली पाहिजे. आपण केलेली एक किरकोळ मदत समोरील व्यक्तीच्या जीवनात बदल घडवून आणू शकते. परवा एका लग्नाला मी गेलो होतो. साधारणत: पन्नाशीतील एक काकू मंडपात असलेल्या प्रचंड गर्दीतून माझ्याजवळ आल्या.

मला पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू व चेहºयावरील स्मितहास्याने त्यांचा हात माझ्या गालावरून फिरवत कडाकडा बोटे मोडली आणि म्हणाल्या,‘राजा, तुझ्यामुळे माझा नवरा वाचला. तुझे उपकार मी विसरू शकत नाही रे...’ त्यांच्या बोलण्यातून त्यांची माझ्याबद्दलची कृतज्ञतेची भावना व्यक्त होत होती. लग्नमंडपात उपस्थित सारे जण अचंबित होऊन संवाद ऐकत होते. आज तब्बल दहा-बारा वर्षांनंतर पुन्हा आम्ही एका लग्नातच भेटत होतो हे विशेष. काकूंकडे पाहिल्यानंतर त्यांच्यासोबत घडलेली घटना मला आठवली.

ती घटना अशी साधारणत: दहा-बारा वर्षांपूर्वीची. संबंधित काकू कलबुर्गीहून त्यांचे पती अंबण्णा यांच्यासोबत एका लग्नासाठी सोलापूरला आल्या होत्या. मीदेखील त्या लग्नात होतो. लग्नकार्य उरकल्यानंतर जेवण करून आम्ही तेथून निघण्याच्या तयारीत होतो. इतक्यात त्या काकूंचे पती अंबण्णा मंडपातच चक्कर येऊन जमिनीवर कोसळले. त्यांचे शरीर थरथर कापत होते. मी लांबूनच ते दृश्य पाहून त्यांच्याजवळ गेलो. त्यांचे शरीर तापाने फणफणलेलं होतं. माझ्या दुचाकीवर त्यांना जवळच असलेल्या डॉ. शिवशंकर यांच्याकडे नेले. डॉक्टरांनी प्रथमोपचार करून त्यांना सोलापुरातील अन्य हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा सल्ला दिला. माझे मित्र डॉ. निर्मल यांना तत्काळ फोन लावून अंबण्णांच्या स्थितीबद्दल माहिती दिली. कॅज्युल्टीत पोहोचल्यानंतर निवासी डॉक्टरांना अंबण्णांच्या स्थितीबद्दल कल्पना दिली. त्यांनी काही इंजेक्शन सांगितले. डॉक्टरांनी औषधाची चिठ्ठी आमच्या हाती सोपवली. थोड्याच वेळात अंबण्णा शांत झोपी गेले होते. डॉक्टरांनी सांगितलेले इंजेक्शन आम्ही आणून दिले.

डॉक्टरांनी सिस्टरांना अंबण्णांच्या हातापायाला बांधलेली दोरी काढायला सांगितले. निवासी डॉक्टर अंबण्णांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी अंबण्णांच्या अगदी जवळ जाऊन आवाज दिला. तितक्यात अंबण्णा जोरात ओरडून ताकदीने स्वत:चे दोन्ही हात झाडले. ताडकन बेडवर उभे राहून सगळ्यांकडे रागाने पाहू लागले. अंबण्णांचे मजबूत हात निवासी डॉक्टरांच्या गालाला लागल्यामुळे त्यांचा एक गाल प्रचंड सुजला होता. त्यांनी अंबण्णा यांचे हातपाय पुन्हा बांधण्याचे आदेश दिले. डॉ. निर्मल यांनी सांगितलेले इंजेक्शन डॉक्टरांनी दिल्यानंतर अंबण्णांकडून औषधाला उत्तम प्रतिसाद मिळून ते पूर्ववत झाले. चार-पाच दिवसांनी अंबण्णांना दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली. पुनर्तपासणीसाठी ते दोन-तीन वेळा सोलापुरात डॉक्टरांकडे येऊन गेले. तेव्हापासून आजतागायत त्यांची तब्येत अगदी ठणठणीत आहे.

वास्तविक पाहता अंबण्णा यांना जो त्रास झाला तो मेंदूज्वराचा होता. या स्थितीत रुग्ण विक्षिप्तपणे वागतो. अशाप्रसंगी तत्काळ वैद्यकीय उपचार रुग्णास मिळणे अत्यंत गरजेचे असते, असे माझ्या डॉक्टर मित्रांनी सांगितले. नाहीतरी अंबण्णांसारखी शांत, प्रेमळ अशी व्यक्ती असं कसं वागू शकते?, असा प्रश्न सुरुवातीला आम्हाला पडला होता. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे अंबण्णा यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. मी केवळ निमित्तमात्र होतो. मी केलेली किरकोळ मदत त्या काकूंना खूप मोलाची वाटत होती. म्हणूनच त्यांनी लग्नात मला पाहून कृतज्ञतेचे भाव व्यक्त केले. आपण केलेली मदत ही एखाद्याचा जीव वाचवू शकते. म्हणून जेव्हा केव्हा अशी गरजू व्यक्ती आपल्या दृष्टीपथास पडते तेव्हा आपणांकडून जे शक्य होईल ते मदत नि:स्वार्थ भावनेतून केले पाहिजे. अशाप्रकारे केलेल्या मदतीतून मिळणारे आत्मिक समाधान संपूर्ण जगात कुठेही पैशाने विकत मिळत नाही.- राजदत्त रासोलगीकर (लेखक शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत)

टॅग्स :Solapurसोलापूर