शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

स्मार्टफोनसोबत आपणही स्मार्ट व्हावं..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 1:15 PM

आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते आहे.

विसावं शतक सुरू झालंय. टष्ट्वेंटी टष्ट्वेंटीची धूम मनात नवीन आशा, उमेद घेऊन नववर्षाचे स्वागत केले. आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते आहे. आपला भारत देशही आज प्रगतीचे अनेक टप्पे पार पाडत यशाची शिखरे पादांक्रांत करतो आहे. डिजिटल इंडिया यामध्ये आपली मोठ्या प्रमाणात प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे. अशाच प्रगतीमध्ये स्मार्टफोनने आपलं अस्तित्व निर्माण केलं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात स्मार्टफोनला महत्त्वाचे स्थान निर्माण झाले आहे. खरं तर आदानप्रदान, संवाद साधण्याचे एक प्रभावी माध्यम मानले जाते. पण वाजवीपेक्षा जास्त वापर व दुरुपयोगच होऊन आजची पिढी बिघडतेय व स्त्रियांची मानहानी होतेय, सामाजिक बांधिलकी नाहीशी होते आहे. खूप छान वाटणाºया स्मार्टफोनमुळे वैवाहिक जीवनात सौख्य नाही, घटस्फोटाचे प्रमाणही वाढले आहे.

सद्यस्थितीला सखीसहेलींना तर हा फोन म्हणजे कटकट वाटते आहे. सांगावे की नको, फोन तर लागतोच, मग नेट नको, पण रेटच असे आहेत की जे आताच्या कंपन्या नेट पॅकसहितच देतात. आपोआप आपण मग सोशल मीडियाकडे वळतो. मित्रमैत्रिणी, नातेवाईक, सामाजिक, निसर्ग असे एक ना अनेक ग्रुप होतात. सुरुवातीला छान माहिती,उपयुक्त मार्गदर्शन मिळत जाते. आपणही गुंतत जातो. मग सुंदर डीपी ठेवले जातात, फोटो शेअर केले जातात.

आपल्या सर्वांचे हेतू छान असताना आपले कौतुक केले जाते. कोणीतरी मैत्री वाढवून तू छान दिसतेस. तू मला फार आवडते, मी फोन करू का? तू वयाने लहानच दिसते. खरंच मी मनापासून बोलत आहे. रागाला नको जाऊस. असे संवाद पोस्ट येतात. नंतर फोन कॉल.. येथे तर तू खूप गोड बोलतेस. आवाज मस्तच आहे. तू बोलत रहावं व मी ऐकत रहावं तासंतास असं वाटतं. रोनो, पिल्लू, सोनू.. अशी गोंडस नावं देऊन घोळवत ठेवून जवळीक वाढवतात. भेटवस्तू पाठवतात. अचानक एक दिवस मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत, आपण भेटूयात असा आग्रह होतो. शेवटी आपण आपली शिकार होतो..

सखींनो असे अनेक अनुभव असतात. तुम्ही यातून जात असता, असे संवाद इतरांनाही सांगू शकत नाही. भांडण करून, दम देऊन, ब्लॉक करून नाही चालणार. कारण या व्यक्ती स्वत:स सेफ (सुरक्षित) ठेवत असतात. स्वत:च्या घरापर्यंत जाणवू देत नाहीत. मैत्री म्हणून घरी बोलवत नाहीत. आपण एक उच्च व्यक्तिमत्त्व बनून टेंभा मिरवत इतरांना असे त्रास देत, उलट वर स्त्री स्वातंत्र्याच्या चर्चा, लेखनही करतील. नाहक त्रास स्त्रीस होतो. तिची अहवेलना केली जाते. ‘ती’ तशीच अशी एक मानसिकता तयार केली जाते.तर मैत्रिणींनो जरा लक्ष द्या, असे त्रासदायक मेसेज आले तर पहिल्यांदा गोडीगुलाबीने सांगा, समजवा, नाही समजले तर नावासहित त्या मेसेजचे स्क्रीन शाॉट काढून व्हायरल करा.

समाजात जाणीव झाली की, सजगता वाढेल व आळा बसेल. भीतीमुक्त निर्णय घ्यायचा व आपण आत्मविश्वासाने चालत या घाणेरड्या विचार प्रवृत्तीला थोपवणे गरजेचे आहे. आपण हे ठामपणे सांगणे गरजेचे आहे. आपणच स्मार्टफोन नीट शिकून घेतला पाहिजे. नवनवीन अ‍ॅपची माहिती घ्यावी. घरबसल्या हातातील मोबाईलचा व्यवसायात वापर केला जातो, हे समजून घेतले पाहिजे. तसेच निर्भया, महिला सक्षमीकरण, सुरक्षा यांचीही माहिती, फोन नंबर सेव्ह करून ठेवावे. जेव्हा आपण स्मार्ट बनू तेव्हा पुढचा कुमकवत बनतो. विनाविषय संवाद टाळा. तुमची माहिती देऊ नका. माणसाला माणूस समजणं कठीण आहे. दक्षता हाच उपाय आहे- विद्या भोसले(लेखिका पर्यावरण व सामाजिक कार्यकर्त्या आहेत.) 

टॅग्स :SolapurसोलापूरSmart Cityस्मार्ट सिटीMobileमोबाइल