शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

माळशिरस तालुक्यात बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2022 10:24 IST

सोलापूर लोकमत न्युज

सांगोला (अरुण लिगाडे ): सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, मोहोळ, पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याने जनावरे भक्ष्य करून फस्त केले तर माणसांवर हल्ले करून जखमी केल्याच्या घटना ताज्या असताना फळवणी (ता. माळशिरस) अकलूज रोडवर पहाटे बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांच्या तोंडच पाणीच पळाले आहे.

दरम्यान, गावात बिबट्या आल्याचे पोलीस पाटील गणेश अवताडे यांनी ग्राम सुरक्षा दलाच्या यंत्रणेवरून नागरिकांना सावध केल्याने ग्रामस्थांमधून भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, माळशिरसचे वन प्रक्षेत्र अधिकारी दयानंद कोकरे यांनीही या वृत्ताला दुजोरा दिल्याने ग्रामस्थ सतर्क झाले आहेत.

 शुक्रवारी पहाटे बावडा (ता.इंदापूर) येथील संदीप शिंदे हे कारमधून महूदकडून अकलूजकडे जाणाऱ्या रस्त्यावरुन बिबट्या कारच्या समोरून जाताना दिसत्या क्षणी त्यांनी त्यांचे चित्रीकरण केले. सदर बिबट्या दत्तात्रय पवार यांच्या दूध डेरीजवळ बिबट्या आढळून आला, त्यांने नारायण प्रल्हाद अवताडे यांच्या संकरित गाईची कालवड व भटके कुत्रे भक्ष्य करून फस्त केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या घटनेची माहिती पोलीस पाटील गणेश अवताडे यांनी ग्राम सुरक्षा दलासह माळशिरस वनपरिक्षेत्र अधिकारी दयानंद कोकरे, वेळापुरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश बागावत, सहाय्यक फौजदार संजय राऊत, वनक्षेत्र पाल गणेश जगदाळे, शैला भोजने यांनी फळवणी गावात सदर ठिकाणी भेट देऊन बिबट्याचे ठसे फस्त केलेली कालवड पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला. 

 नागरिकांनी सतर्क राहावे, स्वतः ची काळजी घ्यावी, घाबरू न जाता लोकांनी रात्री फिरू नये तसेच सोबत घुंगराची काठी मोबाईलचे गाणी मोठमोठ्याने लावावेत तसेच रात्री दारे धरण्यासाठी जायचे असल्यास ग्रुपने बाहेर पडावे असे आवाहन केले आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरsangole-acसांगोलाFarmerशेतकरीagricultureशेतीleopardबिबट्या