शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जाणून घ्या...; किती कोटीची आहे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची मालमत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 15:36 IST

राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या नावे असलेली स्थावर मालमत्ता २0 कोटी ३२ लाख तर जंगम मालमत्ता ३६ कोटी ४३ लाखांची आहे.

ठळक मुद्देसहकारमंत्री देशमुख यांच्या नावे २ कोटी २ लाख, पत्नीच्या नावे ४६ लाख  ३४ हजार, मुलाच्या नावे ७ कोटी  ६६ लाख ४८ हजार असे तिघांचे मिळून १४ कोटी ५२ लाखांचे कर्ज स्थावर मालमत्तेमध्ये देशमुख यांच्या नावे सह्याद्रीनगर व होटगी रोडवरील काडादी प्लॉटमध्ये घर आहेसहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी माढा लोकसभा मतदार संघासाठी अर्ज भरताना प्रतिज्ञापत्राद्वारे मालमत्तेचे विवरण दिलेले आहे

सोलापूर : राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या नावे असलेली स्थावर मालमत्ता २0 कोटी ३२ लाख तर जंगम मालमत्ता ३६ कोटी ४३ लाखांची आहे. गेल्या पाच वर्षांच्या उत्पन्नाचा विचार करता चालू वर्षी देशमुख यांच्या उत्पन्नात घट झाली आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी माढा लोकसभा मतदार संघासाठी अर्ज भरताना प्रतिज्ञापत्राद्वारे मालमत्तेचे विवरण दिलेले आहे. त्यामध्ये देशमुख यांच्या कुटुंबीयांचे चालू वर्षाचे उत्पन्न ७0 लाख ९८ हजार दाखविण्यात आले आहे. सन  २0१३-१४ मध्ये त्यांच्या कुटुंबीयांचे उत्पन्न २ कोटी ३८ लाख ८९ हजार होते. पाच वर्षात त्यांच्या उत्पन्नात १ कोटी ६७ लाखांनी घट झालेली आहे. सन २0१३-१४ मध्ये पत्नी स्मिता यांच्या नावे उत्पन्न २५ लाख ८ हजार ५0 रुपये होते ते चालू वर्षी फक्त ४ हजार ३६६ इतके दाखविण्यात आले आहे. 

स्थावर मालमत्तेमध्ये देशमुख यांच्या नावे सह्याद्रीनगर व होटगी रोडवरील काडादी प्लॉटमध्ये घर आहे. तर मुलगा रोहन यांच्या नावे कोंडी येथे शेती, स्वत: व पत्नीच्या नावे भंडारकवठे, शिरापूर, वडाळा, लांबोटी, बीबीदारफळ येथे शेती आहे. 

या शिवाय लोकमंगल ग्रुप, मनोरमा बँक, नॅचरल शुगर, सोलापूर अ‍ॅग्रो, ठाणे जनता बँक, सोलापूर औद्योगिक बँक, लक्ष्मी बँकेचे  शेअर्स आहेत व विविध बँकांत  ठेवी आहेत.. स्वत:च्या नावे ७५ हजार, पत्नीच्या नावे एक लाख ३ हजार, मुलाच्या नावे ४२ हजार रोकड आहे. याशिवाय तिघांच्या नावे विविध बँकांमध्ये ठेवी आहेत. याशिवाय महापालिकेची १ कोटी १ लाख ८१ हजार इतकी रक्कम  थकीत असून, हा वाद प्रलंबित  आहे. याशिवाय सहकारमंत्री देशमुख यांच्या नावे २ कोटी २ लाख, पत्नीच्या नावे ४६ लाख  ३४ हजार, मुलाच्या नावे ७ कोटी  ६६ लाख ४८ हजार असे तिघांचे मिळून १४ कोटी ५२ लाखांचे कर्ज आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरsolapur-pcसोलापूरmadha-pcमाढाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSubhash Deshmukhसुभाष देशमुख