शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जाणून घ्या; सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाºयांसाठी असलेली खुशखबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 13:51 IST

जिल्हा परिषदेचे आदर्श अंगणवाडी पुरस्कार लवकरच जाहीर; १९२ कर्मचारी अन् ३२ पर्यवेक्षिकांचा होणार सन्मान

ठळक मुद्दे- सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका १५३ व मदतनिसांच्या १५८ जागा रिक्त- सेविकांच्या भरतीत मदतनिसांना सामावून घेण्याचे धोरण, पन्नास टक्के जागा भरण्याचे नियोजन- दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेल्या व दोन वर्षे सेवा केलेल्या मदतनिसांना अंगणवाडीसेविका करण्यात येणार 

सोलापूर : जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाºयांसाठी खूषखबर... गेल्या दोन वषार्पासून प्रलंबित असलेले जिल्हा परिषदेचे आदर्श अंगणवाडी पुरस्कार लवकरच जाहीर केले जाणार असल्याची महिला व बाल कल्याण अधिकारी जे. एस.  शेख यांनी दिली.

जिल्हा परिषदेतर्फे गेल्या दोन वर्षात अंगणवाडी कर्मचाºयांसाठी असलेले पुरस्कार दिलेच नव्हते. महिला व बाल कल्याण समितीच्या सभेत यावर चर्चा झाली. त्यानंतर ही बाब निदर्शनाला आणून दिल्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी यासाठी येणाºया खचार्ला मान्यता दिली. दरवर्षी अकरा तालुक्यातील ९६ अंगणवाडी सेविका व मदतनीस आणि १६ पर्यवेक्षिकांना पुरस्कार दिले जातात. दोन वषार्चे पुरस्कार म्हणजे १९२ अंगणवाडी सेविका व मदतनीस आणि ३२ पर्यवेक्षकांचा सन्मान केला जाणार आहे.  

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत जिल्ह्यात ३ हजार २६९ अंगणवाड्या व ९४५ मिनी अंगणवाड्या चालविल्या जातात. या अंगणवाड्यांतून ६ वर्षे वयोगटाच्या आतील २ लाख ७४ हजार ७२ बालकांचे पोषण व प्रशिक्षण दिले जाते. जिल्ह्याातील  अंगणवाड्यांमध्ये ३११६ सेविका तर ३१११ मदतनीस कार्यरत आहेत.  बालकांचे पोषण व प्राथमिक शिक्षणाबरोबरच आरोग्य खात्यामार्फत राबविल्या जाणाºया विविध योजनांची अंमलबजावणीसाठी अंगणवाडी सेविकांचा उपयोग होतो. लसीकरण असो किंवा गरोदर, स्तनदा माता व किशोरवयीन मुलींच्या पोषणांचे अहवाल सेविका व पर्यवेक्षकांमार्फत दिला जातो.

अंगणवाडीसाठी हेही महत्वाचेजिल्ह्यातील अंगणवाडी सेविका १५३ व मदतनिसांच्या १५८ जागा रिक्त आहेत. यातील पन्नास टक्के जागा भरण्याचे नियोजन आहे. सेविकांच्या भरतीत मदतनिसांना सामावून घेण्याचे धोरण आहे. मदतनिसांसाठी सातवी तर सेविकेसाठी दहावीपर्यंत शिक्षणाची अट आहे. दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेल्या व दोन वर्षे सेवा केलेल्या मदतनिसांना अंगणवाडीसेविका करण्यात येणार आहे. यानुसार तालुका बालविकास अधिकाºयांना रिक्त जागा व पात्र मदतनिसांची यादी करण्याचे सूचित करण्यात आले आहे. अशाप्रकारे सेविकांची भरती केल्यावर ही पदे कमी होऊन मदतनिसांची रिक्त पदे वाढणार आहेत. त्यानंतर या पदावर भरती घेतली जाणार आहे.  सेविका व मदतनिसांची भरती करताना कुपोषित बालकांचे प्रमाण, डोंगराळ व दुर्गम भाग, मुलांची उपस्थिती यांचा प्राधान्याने विचार करण्याचे सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार भरतीची प्रक्रिया तालुकास्तरावर राबविली जाणार आहे. भरती करताना शिक्षण व अनुभवानुसार गुण ठरविले जाणार आहेत, असे शेख यांनी सांगितले. 

टॅग्स :Solapurसोलापूरanganewadi jatraआंगणेवाडीSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदjobनोकरी