एल.बी.टी. न भरल्याने ३९ दुकानांना सील
By Admin | Updated: October 22, 2014 14:37 IST2014-10-22T14:37:09+5:302014-10-22T14:37:09+5:30
स्थानिक संस्था कर (एल.बी.टी.) न भरल्याने महापालिकेच्या कर संकलन विभागाच्या वतीने धडक कारवाईला सुरुवात केली असून रविवार व सोमवारी ३९ दुकानांना सील करण्यात आले आहे.

एल.बी.टी. न भरल्याने ३९ दुकानांना सील
सोलापूर : स्थानिक संस्था कर (एल.बी.टी.) न भरल्याने महापालिकेच्या कर संकलन विभागाच्या वतीने धडक कारवाईला सुरुवात केली असून रविवार व सोमवारी ३९ दुकानांना सील करण्यात आले आहे.
जकात बंद झाल्याने राज्य शासनाच्या आदेशानुसार सोलापूरला एल.बी.टी. कर लागू करण्यात आला आहे; मात्र व्यापार्यांनी एल.बी.टी. जाचक अटीमुळे या कर प्रणालीला विरोध केला आहे. महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी व्यापार्यांना नियमानुसार विवरणपत्र भरून कर भरण्याचे आवाहन केले होते; मात्र काही व्यापार्यांनी हा कर भरला तर काहींनी तो न भरण्याचा निर्णय घेतला होता. वेळोवेळी सूचना व आवाहन करूनही एल.बी.टी. न भरल्याने कर वसुली करण्याबाबत कर संकलन कार्यालयास आदेश दिले आहेत. त्यानुसार आयातकर अधीक्षक मोहन याटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयातकर अधीक्षक विश्वनाथ किरनाळी, मुख्य आयातकर निरीक्षक रवींद्र कांगरे, पी.व्ही. करणकोट, आयातकर अधीक्षक रामचंद्र काळे, अनिल कारकले, अमर कादे, उमेश दंतकाळे, शिवाजी चटके, अशोक डोळसे, विश्वनाथ इरकाल, लक्ष्मण सुरवसे, प्रमोद दुलगुंडी, शकुर जिनेडी यांनी कारवाई केली आहे. कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी व्यापार्यांनी नियमानुसार एल.बी.टी. भरावा असे आवाहन कर संकलन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)