शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

रात्री उशिरा चहा पाजणं अध्यक्षाला पडलं महागात; हॉटेलसमोर राडा, दोघांचं नाक-तोंड फुटलं

By विलास जळकोटकर | Updated: August 17, 2023 17:30 IST

या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस रामा हरिदास भिंगारे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन भांडण आटोक्यात आणले. त्यांनी जमावातील दहाजणांविरुद्ध फिर्याद दिली.

सोलापूर : चौकातील तरुण मंडळांच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर चहाला घेऊन जाणाऱ्या अध्यक्षाला चहा पाजणं महागात पडलं. हॉटेसमोर शाब्दिक बाचाबाचीतून हाणामारी झाली. या नव्या अध्यक्षासह दोघे जखमी झाले. शास्त्री नगर येथील नुरदरिया हॉटेसमोर बुधवारी रात्री ११:१५ च्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी दहा जणांविरुद्ध बेकायदेशीर जमाव जमवून शांततेचा भंग केल्याबद्दल गुरुवारी पहाटे गुन्हा नोंदला आहे.

या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस रामा हरिदास भिंगारे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन भांडण आटोक्यात आणले. त्यांनी जमावातील दहाजणांविरुद्ध फिर्याद दिली. यात म्हटले आहे की, सत्तनाम चौक यजेथील महावीर तालीम तरुण मंडळाच्या नूतन अध्यक्षपदी बुधवारी संतोष वसंत मरेड्डी याची निवड करण्यात आली. रात्री ११ च्या सुमारास अध्यक्ष संतोष मरेड्डी याने सर्वांना चहा पाजायला शास्त्री नगर येथील नुरदिया हॉटेलकडे आणले होते.

यावेळी जमावातील नऊजणांचे अरबाज शब्बीर बेपारी यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. यातून हाणामारी सुरु झाली. यात अध्यक्ष संतोष मरेडडी व अरबाज बेपारी यांच्या नाकाला व चेहऱ्याला बाचाबाचीत जखम झाली.पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून तणावपूर्ण वातावरण आटोक्यात आणले. दहाजणांविरुद्ध बेकायदेशीर जमाव जमवल्याबद्दल गुरुवारी पहाटे गुन्हा दाखल केला. तपास हवालदार इनामदार करीत आहेत.

यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदलेसदर बझार पोलिसांनी या प्रकरणी दर्गादास विजय म्हेत्रे, सागर दीपक कोरे, प्रशांत हिरालाल सोंडेकर, प्रथमेश संजय कोल्लूर, महेश रमेश कोरे, संतोष वसंत मरेड्डी, गणेश भारत रोकडे, पंकज संजय कोल्लूर, योगीराज राजू म्हेत्रे, अरबाज शब्बीर बेपारी (सर्व सत्तनाम चौक, सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSolapurसोलापूर