घरमालकाच्या मुलाने केला विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:21 IST2021-03-18T04:21:56+5:302021-03-18T04:21:56+5:30

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही पती व दोन मुलांसोबत घर मालक नारायण देवराव गायकवाड यांच्या प्लॉटमध्ये चार ...

The landlord's son molested her | घरमालकाच्या मुलाने केला विनयभंग

घरमालकाच्या मुलाने केला विनयभंग

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही पती व दोन मुलांसोबत घर मालक नारायण देवराव गायकवाड यांच्या प्लॉटमध्ये चार महिन्यापासून भाडेतत्वावर राहत आहे. १६ मार्च रोजी दुपारी १ च्या सुमारास पीडित महिला घरी असताना घरमालक तिच्या घरी आले व घर भाडे द्या, अशी मागणी केली. त्यावेळी तिने पती घरी नसल्याचे सांगितले. थोड्या वेळानंतर पती घरी आले येताच याबाबत चर्चा केली. नंतर घर भाडे घेऊन जाण्यास सांगितले.

नंतर घरमालकाचा मुलगा व पुतण्या, तसेच इतर ५ ते ६ अनोळखी व्यक्ती पीडित महिलेच्या घरी आले. तिच्या पतीने दरवाजा उघडताच घरमालकाच्या मुलाने मारहाण केली. इतर सर्व लोक शिवीगाळ करून गोंधळ घालू लागले. तेव्हा पीडित महिला भांडण सोडण्यासाठी गेली असता विनयभंग केला व जिवे ठार मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद पीडित महिलेने टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दिली आहे. पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक अमित शितोळे हे करीत आहेत.

Web Title: The landlord's son molested her