लग्न सोहळ्यात विवाहितेच्या दागिन्यांची पर्स लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:17 IST2021-07-20T04:17:21+5:302021-07-20T04:17:21+5:30

मोहोळ : भावाच्या लग्नासाठी आलेल्या विवाहितेचे दागिन्यांची पर्स चोरट्यांनी लांबविल्याची घटना १८ जुलै रोजी पाटकुल येथे घडली. या पर्समध्ये ...

Lampas for wedding jewelry purse at the wedding ceremony | लग्न सोहळ्यात विवाहितेच्या दागिन्यांची पर्स लंपास

लग्न सोहळ्यात विवाहितेच्या दागिन्यांची पर्स लंपास

मोहोळ : भावाच्या लग्नासाठी आलेल्या विवाहितेचे दागिन्यांची पर्स चोरट्यांनी लांबविल्याची घटना १८ जुलै रोजी पाटकुल येथे घडली. या पर्समध्ये सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ७१ हजार ५०० रुपयांचा ऐवज होता.

याप्रकरणी वनिता दत्तात्रय पाराध्ये (रा. गोपाळपूर, ता.पंढरपूर) यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, मोहोळ तालुक्यात पाटकुल येथील लोंढे वस्तीवर भावाच्या लग्न सोहळ्यासाठी वनिता कुटुंबासमवेत आल्या होत्या. खोलीमध्ये दागिन्यांची पर्स ठेवून अक्षतासाठी बाहेर आल्या होत्या. अक्षता टाकून परत पर्स घेण्यासाठी गेल्या असता ठेवलेल्या ठिकाणी त्यांची पर्स दिसली नाही. जवळपास व तेथे असलेल्या सर्व नातेवाइकांकडे विचारपूस करून शोध घेतला. परंतु पर्स मिळून आली नाही. पर्समध्ये कर्णफुले, रिंग जोड, साखळी व रोख दीड हजार रुपये असा ७१ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळविला. या घटनेचा अधिक तपास सहायक फौजदार लोभू चव्हाण करीत आहेत.

Web Title: Lampas for wedding jewelry purse at the wedding ceremony