लक्ष्मी आनंद प्रतिष्ठान प्राथमिक आरोग्य केंद्रास बाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:17 IST2021-06-06T04:17:20+5:302021-06-06T04:17:20+5:30

टेंभुर्णी : येथील बोबडे गटाचे प्रमुख स्व. ॲड. कृष्णात बोबडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लक्ष्मी आनंद प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर, वृक्षारोपण ...

Lakshmi Anand Pratishthan Primary Health Center Bakde | लक्ष्मी आनंद प्रतिष्ठान प्राथमिक आरोग्य केंद्रास बाकडे

लक्ष्मी आनंद प्रतिष्ठान प्राथमिक आरोग्य केंद्रास बाकडे

टेंभुर्णी : येथील बोबडे गटाचे प्रमुख स्व. ॲड. कृष्णात बोबडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लक्ष्मी आनंद प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर, वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास बाकडे देण्यात आले.

रक्तदान शिबिराचे उद्घाटन बंकट देशमुख व दशरथ देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेनेचे नेते संजय कोकाटे, भाजपचे तालुकाध्यक्ष योगेश बोबडे, भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ढगे, भाऊ महाडीक, गिरीश तांबे, विकास धोत्रे, रिपाइं (ए) चे जिल्हाध्यक्ष जयवंत पोळ, नागनाथ वाघे, संभाजी पाटील, हरिभाऊ सटाले, शेखर जगताप, सतीश नेवसे, उद्योजक नागेश बोबडे, ॲड. रूपेश बोबडे उपस्थित होते.

तसेच येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास रुग्णांसाठी स्टीलचे बाकडे देण्यात आले. कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना अंडी वाटप करण्यात आली. टेंभुर्णी-अकलूज रोडवरील दुभाजकात वृक्षारोपण झाले. कुर्डूवाडी येथील ब्लड सेंटर या ब्लड बँकेचे डॉ. प्रकाश बेलपत्रे यांच्या पथकाने रक्तसंकलन केले. या उपक्रमासाठी नागेश कल्याणी, गोवर्धन नेवसे, संदीप देशमुख, महावीर लोंढे, समाधान देशमुख, रामचंद्र हुंबे, केशव पाटील, संतोष देशमुख, सोमनाथ ताबे, सुजित बेलपत्रे, धनाजी महाडिक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

---

फोटो : ०५ टेंभुर्णी १

प्राथमिक आरोग्य केंद्रास स्टील बाकडे देताना योगेश बोबडे, डॉ. अमोल माने, डाॅ. विक्रांत रेळेकर, नागेश बोबडे, ॲड. रूपेश बोबडे.

Web Title: Lakshmi Anand Pratishthan Primary Health Center Bakde