शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

माळशिरसमधील युवकाचा कुर्डूवाडीत खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 12:24 IST

पूर्ववैमनस्यातून घडला प्रकार : अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल

ठळक मुद्दे ग्रामीण रूग्णालयात बघ्यांची मोठी गर्दी१० ते १२ जणांवर गुन्हा दाखलशवविच्छेदन करण्यास नकार 

सोलापूर : पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने वार करून माजी नगरसेवकाच्या मेव्हण्याचा खून केल्याची घटना कुर्डूवाडी बायपास टोलनाक्याजवळ  घडली. विकी गायकवाड (रा. माळशिरस) असे खून करण्यात आलेल्याचे नाव आहे. 

विकी गायकवाड हा कुर्डूवाडी येथे आपले मेव्हणे माजी नगरसेवक अमरकुमार माने यांच्याकडे राहत होता. विकी हा रविवारी दुपारी अमरकुमार माने यांना माढा येथे भेटायला जाताना त्याच्या गाडीवर अज्ञात तरूणांनी दगडफेक केली. तो गाडीतून खाली उतरून जाताना त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याचा खून करण्यात आला. त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. एप्रिलमध्ये विकी गायकवाड, अमर माने यांच्यासह त्यांच्या पाच मित्रांवर प्राणघातक हल्ला, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणी विकी गायकवाडला जामीन मिळाला होता. तो माढा पोलिसांत हजेरी लावून माढ्याकडे जाताना ही घटना घडली़ आरोपींना अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला आहे.

पोलिसांत अद्याप तक्रार दाखल झाली नसून, या घटनेमुळे ग्रामीण रूग्णालयात बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे. याबाबत संतोष विश्वंभर माने यांच्या फिर्यादीवरून माणिक धनंजय श्रीरामे, आकाश सुरेश राजगिरे,विनोद उर्फ एक्या विजय सोनवणे, अनंत विजय सोनवणे, आकाश श्रीरामे, अर्जुन श्रीरामे, संतोष मारकड, सूरज सुभाष जगताप, सुभाष उर्फ बापूसाहेब जगताप, आक्रम खान, इम्रान रफीक पठाण व इतर १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल झाला असून तपास पो. नि. ईश्वर ओमासे करीत आहेत. 

घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी यांनी भेट दिली.

   शवविच्छेदन करण्यास नकार 

  • - आरोपींना अटक करेपर्यंत विकी गायकवाड याचे शवविच्छेदन करण्यास मृताच्या नातेवाईकांनी नकार दिला आहे. पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे हे ग्रामीण रुग्णालय येथे आले असता त्यांना मृताच्या नातेवाईकांनी घेराव घालत आरोपीला अटक करा, अशी मागणी केली. 
  • - रात्री आठ वाजता अमर माने यांना माढा कारागृहातून कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले. त्यानंतर पोलिसांच्या पुढील प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात शांतता कमिटीच्या बैठकीत अमर माने यांनी शहरातील अवैध मद्य विक्री बंद करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर माणिक श्रीरामे व त्याचे सहकारी यांच्यात पोलीस ठाण्याच्या आवारातच बाचाबाची झाली होती. त्यानंतर ९ एप्रिल रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मागील भांडणाचा राग मनात धरुन सध्या मयत असलेला विकी गायकवाड, अमर माने यांच्यासह पाच जणांनी माणिक श्रीरामे व त्याचा भाऊ अर्जुन याच्यावर हल्ला करुन गंभीर जखमी केले होते. 
  • - या गुन्ह्यातच अटकेत असलेला विकी गायकवाड याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी जामिनावर सुटका करण्यात आली होती. मात्र त्याचा मेहुणा अमर माने हा माढा कारागृहातच होता. याला भेटण्यास जात असतानाच हा प्रकार घडला.
टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसCrimeगुन्हाPoliceपोलिस