कृष्णात बोबडे यांच्या आठवणींना दिला उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:46 IST2020-12-17T04:46:41+5:302020-12-17T04:46:41+5:30

टेंभुर्णी : कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व माढा तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन स्व. कृष्णात बोबडे यांना ...

Krishna gave light to Bobade's memories | कृष्णात बोबडे यांच्या आठवणींना दिला उजाळा

कृष्णात बोबडे यांच्या आठवणींना दिला उजाळा

टेंभुर्णी : कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व माढा तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन स्व. कृष्णात बोबडे यांना टेंभुर्णी ग्रामपंचायतच्या बोबडे गटाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मनोगतातून अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

टेंभुर्णी शहराचे सरपंच आणि माढा तालुका पंचायत समितीचे सदस्य असताना त्यांनी केलेल्या विविध कार्याबद्दल तसेच शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामाबद्दल मधुकर देशमुख, जयवंत पोळ, उद्योगपती औदुंबर महाडिक यांनी गौरवोद‌्गार काढले. बोबडे यांच्या निधनाने टेंभुर्णी शहराच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली, अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी गिरीश तांबे, हरिभाऊ सटाले, संतोष वाघे, विकास धोत्रे, नागनाथ वाघे, बाळासाहेब ढगे, दशरथ देशमुख, संदीप देशमुख, सतीश नेवसे, अतुल खुळे, दत्ता डोके, राहुल कांबळे, दत्ता जाधव उपस्थित होते.

----

फोटो : १६ टेंभुर्णी

स्वर्गीय कृष्णात बोबडे यांना श्रद्धांजली वाहताना बोबडे गटाचे कार्यकर्ते.

Web Title: Krishna gave light to Bobade's memories