सोलापूर महापालिकेचा कोविड नियंत्रण कक्ष ठरला मॉडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 03:11 PM2020-08-17T15:11:35+5:302020-08-17T15:14:46+5:30

प्रशासनाचा दावा; महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, धनराज पांडे यांची महत्त्वाची भूमिका

Kovid control room of Solapur Municipal Corporation became a model | सोलापूर महापालिकेचा कोविड नियंत्रण कक्ष ठरला मॉडेल

सोलापूर महापालिकेचा कोविड नियंत्रण कक्ष ठरला मॉडेल

Next
ठळक मुद्देमहापालिकेच्या फेसबुक पेजवरुन दररोज कोविड संदर्भात आणि शहरातील नव्या सेवेसंदर्भातील माहिती दिली तज्ज्ञ व्यक्ती, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मार्गदर्शन करतातरुग्णालयातील गैरहजर डॉक्टर, कर्मचारी यांची माहिती कंट्रोल रुममधील कर्मचारी संकलित करतात

सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पहिली दोन महिने टीकेचे लक्ष्य ठरलेला महापालिकेचा कोविड-१९ नियंत्रण कक्ष आता चांगल्या कामाचे मॉडेल बनला आहे. कोल्हापूर, सांगली, ठाणे, पनवेलसह १० हून अधिक महापालिकांनी या कक्षाच्या कामाची माहिती घेतल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

कोरोनाबाधित रुग्णांना हॉस्पिटलमध्ये त्वरित बेड उपलब्ध व्हावा, खासगी आणि मनपा आरोग्य विभागाच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी या कक्षाची स्थापना करण्यात आली होती, परंतु या कक्षातील लोक फोन उचलत नाहीत. कक्षातून निरोप दिला तरी खासगी रुग्णालये रुग्णांना दाखल करून घेत नाहीत, उपचाराअभावी रुग्णांचा मृत्यू होतोय अशा अनेक तक्रारी सुरू होत्या.

यादरम्यान स्थानिक निधी विभागाचे सहायक संचालक धनराज पांडे यांची नियंत्रण कक्षाच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली. त्यानंतर मात्र या कक्षाच्या कामात सुधारणा होत गेल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. कोल्हापूर, सांगली, लातूर, ठाणे, नांदेड, पालघर, वसई-विरार, पनवेल या महापालिका क्षेत्रातील आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे येथील अधिकाºयांनी सोलापुरातील नियंत्रण कक्षासारखे काम सुरू केले आहे.

रुग्णालयातील बेडची माहिती आॅनलाईन उपलब्ध
मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सरकारी, खासगी रुग्णालये अधिग्रहित केली. या रुग्णालयात कोविड आणि नॉन कोविड रुग्णांच्या उपचारासाठी नेमके किती बेड उपलब्ध आहेत याची माहिती महापालिकेच्या बेवसाईटवर मिळते. हा डॅशबोर्ड अपडेट असतो. यासाठी रुग्णालयातील कर्मचाºयांना प्रशिक्षण दिले. डॅशबोर्ड अपडेट नसला की रुग्णालयांवर कारवाई होते. अशाच पद्धतीने महात्मा फुले जनआरोग्य योजनेचाही एक आॅनलाईन डॅशबोर्ड मनपाच्या बेवसाईटवर आहे.

आॅनलाईन मार्गदर्शन, गुन्हे दाखल
महापालिकेच्या फेसबुक पेजवरुन दररोज कोविड संदर्भात आणि शहरातील नव्या सेवेसंदर्भातील माहिती दिली जाते. तज्ज्ञ व्यक्ती, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मार्गदर्शन करतात. कोविडसाठी अधिग्रहित केलेल्या रुग्णालयातील गैरहजर डॉक्टर, कर्मचारी यांची माहिती कंट्रोल रुममधील कर्मचारी संकलित करतात. या कर्मचाºयांवर गुन्हे दाखल केले जातात.

Web Title: Kovid control room of Solapur Municipal Corporation became a model

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.