उंबरे-पागे येथे कोविड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:23 IST2021-05-13T04:23:11+5:302021-05-13T04:23:11+5:30
मोहोळ ग्रामदैवत नागनाथांची यात्रा रद्द मोहोळ : ग्रामदैवत नागनाथ यांची यात्रा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली आहे. ११ ...

उंबरे-पागे येथे कोविड सेंटर
मोहोळ ग्रामदैवत नागनाथांची यात्रा रद्द
मोहोळ : ग्रामदैवत नागनाथ यांची यात्रा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली आहे. ११ ते २२ मे या कालावधीत ही यात्रा होत आहे. देवस्थानचे प्रमुख मानकरी भाऊसाहेब देशमुख, आण्णासाहेब देशमुख, नागनाथ देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष प्रकाश देशमुख, सचिव अभिनंदन गुमते, मानकरी राजेंद्र खर्गे महाराज, विनायक मोहोळकर, राजाभाऊ कुर्डे, बबन कुर्डे यांची यात्रासंबंधित बैठक पार पडली. या बैठकीत यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
चिखर्डेत ५१ जणांचे रक्तदान
बार्शी : चिखर्डे ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आलेल्या शिबिरात ५१ जणांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांचा सरपंच प्रकाश पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच अरुण चौधरी, ग्रामपंचायत सदस्य अरुण पाचकवडे, जयराम अडगळे, हनुमंत आपुने, सुभाष देवकर, समीर शेख, प्राजक्ता कोंढारे, अमित कोंढारे, मोहन मसेकर, नानासाहेब कोंढारे, विजय कोंढारे उपस्थित होते.
नान्नजमध्ये कोरोना रुग्णांना अन्नदान
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या सेंट लुक्स हॉस्पिटलच्या कोविड सेंटरमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांना युथ संकल्प फाउण्डेशनच्या वतीने अन्नदान करण्यात आले. या उपक्रमांतर्गत प्रोटिनयुक्त आहार, रात्रीचे जेवण देण्यात आले. २९ एप्रिलपासून हे अन्नदान सुरू आहे. यावेळी फाउण्डेशनचे व्यवस्थापक संभाजी दडे, योगेश गवळी, शैलेश गवळी, विजय भंडारे, प्रतीक चिंदरकर, अफजल शेख, खंडू आवटे, मनोज मोहिते, दिलीप सोळसे उपस्थित होते.