कोतवालास ट्रकमधून खाली ढकलले
By Admin | Updated: December 31, 2015 13:56 IST2015-12-31T13:55:19+5:302015-12-31T13:56:14+5:30
अवैध वाळू वाहतूक करणार्या ट्रकवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या कोतवालास ट्रकमधून खाली ढकलून दिल्याची घटना मंगळवार २९ डिसेंबर रोजी रात्री बाराच्या सुमारास घडली.

कोतवालास ट्रकमधून खाली ढकलले
सोलापूर : अवैध वाळू वाहतूक करणार्या ट्रकवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या कोतवालास ट्रकमधून खाली ढकलून दिल्याची घटना मंगळवार २९ डिसेंबर रोजी रात्री बाराच्या सुमारास घडली.
अनिल महादेव काळे (रा. माळकवठा, ता.द.सोलापूर) व मेघराज राठोड (रा. जुळे सोलापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अनिल काळे व मेघराज राठोड या दोघांनी आपल्या कब्जातील मालट्रक एमएच १३ आर ४८१६ यात ६0 हजार रुपये किमतीची ६ ब्रास वाळू विनापरवाना घेऊन जात होते. हा ट्रक मंद्रुप पोस्टकडे जात असताना मंद्रुपच्या जे. डी. पाटील यांच्या शाळेच्याजवळील रोडवरील माळकवठय़ाकडे जाणार्या रोडवर गाडी कोतवालने अडविली.
ही गाडी कोतवाल ट्रकमध्ये बसून पोलीस स्टेशनकडे नेत असताना कोतवाल यास ट्रकमधून अनिल काळे व मेघराज राठोड यांनी ढकलून दिले. याप्रकरणी धर्मराज बाप्पासाहेब जाधव (वय ३५ रा, सोलापूर) यांनी फिर्याद दिली असून,पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक घाडगे हे करीत आहेत. (प्रतिनिधी)