कोरवली - अंत्रोळी रस्त्याचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:16 IST2021-07-02T04:16:00+5:302021-07-02T04:16:00+5:30

कुरुल : कोरवली - अंत्रोळी हा तीन किलोमीटर रस्ता दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या मदतीने पूर्ण झाला. कोरवली ग्रामस्थांनी या कंपनीच्या ...

Koravali - Dedication of Antroli Road | कोरवली - अंत्रोळी रस्त्याचे लोकार्पण

कोरवली - अंत्रोळी रस्त्याचे लोकार्पण

कुरुल : कोरवली - अंत्रोळी हा तीन किलोमीटर रस्ता दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या मदतीने पूर्ण झाला. कोरवली ग्रामस्थांनी या कंपनीच्या मदतीने हा रस्ता वेळेत पूर्ण करून घेतला. इतर गावांनी देखील अशाच पद्धतीने प्रयत्न करावेत, असे आवाहन कामती पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी केले.

या रस्त्याचे लोकार्पण लोकशक्ती शुगरचे उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. अमोल पाटील, डॉ. राहुल पाटील, शिवानंद म्हमाणे, साधू पाटील, सिद्धाराम म्हमाणे, ग्रामविकास अधिकारी संजय आदमिले, सरपंच सुज्ञानी पाटील, उपसरपंच शशिकांत कस्तुरे उपस्थित होते. यावेळी लोकशक्ती शुगरचे उपाध्यक्ष शिवानंद पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने, जनसंपर्क अधिकारी अभिषेक दुबे यांची समयोचित भाषणे झाली.

ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने दिलीप बिल्डकॉन कंपनीचे प्रदीपकुमार सिंग, जनसंपर्क अधिकारी अभिषेक दुबे, पवनकुमार शुक्ला, ब्रीजेश तिवारी, शंकर भालेराव, गुरुसिंग यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी दयानंद पाटील, सुरेश म्हमाणे, दयानंद तारके, महासिद्ध वाले, अमोल गेंगाणे, दत्ता भीमदे, मुन्ना म्हमाणे, दत्ता म्हमाणे यांनी परिश्रम घेतले.

----

फोटो: ३१ दिलीप बिल्डकॉन

कोरवली-अंत्रोळी रस्त्याचे लोकार्पण करताना लोकशक्ती शुगरचे उपाध्यक्ष शिवानंद पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने, प्रदीपकुमार सिंग, अभिषेक दुबे, डॉ. अमोल पाटील.

Web Title: Koravali - Dedication of Antroli Road