कोरफळे- श्रीपतपिंपरी पाणंद रस्त्यासाठी शेतकऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:40 IST2021-02-18T04:40:28+5:302021-02-18T04:40:28+5:30
याबाबत कोरफळेच्या महिलांसह अनेक शेतकऱ्यांनी तहसीलदार प्रदीप शेलार याना समक्ष भेटून निवेदन दिले. पाणंद रस्त्यासाठी या परिसरातील १४० ...

कोरफळे- श्रीपतपिंपरी पाणंद रस्त्यासाठी शेतकऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा
याबाबत कोरफळेच्या महिलांसह अनेक शेतकऱ्यांनी तहसीलदार प्रदीप शेलार याना समक्ष भेटून निवेदन दिले. पाणंद रस्त्यासाठी या परिसरातील १४० शेतकरी असून, त्यातील सर्वांनी संमती दिली. त्यांच्या शेतातून हा रस्ता सुद्धा झालेला आहे. फक्त २ शेतकऱ्यांनी विरोध करून रस्ता अडवला आहे. गावातील शेतकऱ्यांनी बैठक घेऊन त्यास मंजुरी देऊन लोकवर्गणी गोळा केली आहे. मात्र यातील फक्त दोघानी हा पाणंद रस्ता अडला असल्याने या भागातील अनेक महिलांना ओढ्यातील पाण्यातून जावे लागत आहे. शेतकऱ्यांनाही आपापल्या शेतात आवढ्यातून जावे लागते. त्यामुळे या शेतकऱ्यांनी पाणंद रस्त्याची मागणी केलेली आहे. निवेदन देतेवेळी महिलासह १०० शेतकरी उपस्थित होते.
----