कोंबडवाडी - किडबिसरी रस्त्यावर वाळू पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:23 IST2021-04-09T04:23:45+5:302021-04-09T04:23:45+5:30

सांगोला : चोरून वाळू उपसा करून घेऊन जाणाऱ्या दोघांना सांगोला पोलिसांनी पकडले आहे. या कारवाईत दोन ट्रॅक्टरसह एक ...

Kombadwadi - Kidbisari caught sand on the road | कोंबडवाडी - किडबिसरी रस्त्यावर वाळू पकडली

कोंबडवाडी - किडबिसरी रस्त्यावर वाळू पकडली

सांगोला : चोरून वाळू उपसा करून घेऊन जाणाऱ्या दोघांना सांगोला पोलिसांनी पकडले आहे. या कारवाईत दोन ट्रॅक्टरसह एक ब्रास वाळू असा एकूण ४ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई कोंबडवाडी - किडबिसरी रस्त्यावर झाली. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल गणेश कोळेकर यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी ज्ञानू ऊर्फ ज्ञानेश्वर चंद्रकांत सरगर, भगवान विठ्ठल सरगर (दोघे रा. कोंबडवाडी, ता. सांगोला) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या कारवाईत पोलीस हेडकॉन्स्टेबल काझी, गणेश कोळेकर, होमगार्ड ठोंबरे व आलदर यांनी सहभाग नोंदवला. हे एका खाजगी वाहनातून बुधवारी कोळा हद्दीत गस्त घालीत होते. त्यावेळी कोंबडवाडी-किडबिसरी रस्त्यावर झेडपी शाळेसमोरून कोंबडवाडी ओढ्यातून दोन ट्रॅक्टर एकामागे एक येताना दिसले. संशयावरून चालकास ट्रॅक्टर रोडच्या बाजूला घेण्यास सांगून पोलिसांनी तपासणी केली असता ट्रॉलीमध्ये वाळू आढळली. पोलिसांनी दोघा ट्रॅक्टर चालकास ताब्यात घेऊन २ लाख ७४ हजार रुपयांचा एक बिगर नंबरचा ट्रॅक्टर व डंपिंग ट्रॉलीसह एक ब्रास वाळू असा सुमारे ४ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Web Title: Kombadwadi - Kidbisari caught sand on the road