सोशल मिडियावर व्हायरल करतो अशी धमकी देत अल्पवयीन मुलीचं घेतलं चुंबन
By विलास जळकोटकर | Updated: June 7, 2023 16:36 IST2023-06-07T16:36:48+5:302023-06-07T16:36:57+5:30
सोलापूर : माझ्यासोबत बागेत येण्यास नकार दिल्यास आपले प्रेमसंबंध सोशलमिडियावर व्हायरल करतो म्हणून अल्पवयीन मुलीला बागेत नेले आणि तिचे ...

सोशल मिडियावर व्हायरल करतो अशी धमकी देत अल्पवयीन मुलीचं घेतलं चुंबन
सोलापूर : माझ्यासोबत बागेत येण्यास नकार दिल्यास आपले प्रेमसंबंध सोशलमिडियावर व्हायरल करतो म्हणून अल्पवयीन मुलीला बागेत नेले आणि तिचे चुंबन घेतले. पुढे काही करण्याच्या अगोदर ती रागावली अन् घरी आणून सोडले. आईला प्रकाराची कल्पना देऊन पिडित मुलीने त्या तरुणाविरुद्ध पोलिसात तक्रार दिली.
ही घटना २८ मे रोजी घडली. या प्रकरणी मंगळवारी (६ जून) रोजी जाहीद उर्फ जैद हिरोली याच्या विरुद्ध गुन्हा नोंदला आहे. यातील १६ वर्षाची अल्पवयीन मुलीला यातील आरोपीने २८ मे रोजी फोन करुन ‘मी तुला सोबत घेऊन जाणार आहे. नाही आल्यास आपले प्रेमसंबंध सोशलमिडियावर जाहीर करण्याची धमकी दिल्याने अल्पवयीन मुलगी आणि संशयित आरोपी बाईकवरुन बागेत गेले. तेथे आरोपीने ‘तु मला आवडतेस, तुझ्या लग्न करणार आहे असे म्हणून तिच्या गालावर हात फिरवून तिचे चुंबन घेतले. यामुळे पिडितेने रागावून पुढे काही करण्याच्या अगोदर प्रतिकार केला. अखेर त्याने बाईकवरुन पिडितेला घरी आणून सोडले.
काही दिवसांनी म्हणजे ५ जून रोजी त्यांनी पुन्हा बागेत जाण्यासाठी विचारणा केली. यावर पिडितेने घाबरुन तिच्या आईला सारा प्रकार सांगितला. यावरुन पडिताने आईसोबत पोलीस ठाणे गाठून सदर आरोपीविरुद्ध तक्रार दिल्याने सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.